परीक्षा तुम्ही आणि परत परीक्षा
प्रत्येक वेळी मलाच टोचून बोलता राव तुम्ही. निर्णय घ्यायचे कोणीतरी आणि शिव्या खायच्या आम्ही हे काही बरोबर नाही. आई ज्याप्रमाणे सर्व लेकरांसाठी समान असते तशीच मी पण आहे. मला पण समजतंय रे सर्व तुम्ही लाखो लोक माझ्यावर प्रेम करता आणि हे अजून वाढतंच चाललं आहे. आता मला याचा खूप ताण पडत आहे. होय मी MPSC आहे, मागच्या काही दिवसात तुमची झालेली मनस्थिती मला चांगली माहीत आहे. खूप सारी पोरं भयंकर तणावात जगत आहेत. काहींचा अभ्यास होत नाही तर काही आता तो करतच नाहीत. आज अचानक माझ्यावर प्रेम करणारा नामु (नामदेव) मला भेटला, खूप रडला माझ्याजवळ आता कदाचीत ही शेवटची भेट असणार अस बोलत होता. मागच्या ३ वर्षांपासून माझ्यावर खूप प्रेम करणारा आज असा अचानक का बोलत असेल बरं. खूप अभ्यासू होता तो, मागच्या वेळी जवळपास अधिकारी फिक्स होता. त्यावेळी सुद्धा असाच रडून मोकळा झाला होता तो, मी तरी काय करणार ना waiting list नावाचा प्रकार पाहिजे असं मला पण वाटत, तो माझा हक्क काही लोकांमुळे मला मिळाला नाही. मला असे तुम्ही उदास होऊन बसलेले अजिबात पाहवत नाही. नाम्या मला बोलला होता पुढच्या वर्षी आपलं फिक्स बरं का...! मी पण मनो...