ऑनलाइन शिक्षणाच्या आईचा घो...!!!

आपण चुकतोय, खूप मोठं संकट ओढवून घेत आहोत याची जरादेखील कल्पना आपल्याला नाही. लेकरांच्या बापानो आणि आयानो कदाचित वेळ हातात असेल, “कदाचित". एक वाईट व्यसन तुमच्या लेकरांना लागलेलं आहे.
आपले दिवस आठवा, आपल्या हातात तो मोबाईल आपल्या वयाच्या कितव्या वर्षी आला ते आठवा. काळ बदलत नसतो आपण बदलत असतो. आजच जग खूप फास्ट झालं आहे आपण म्हणतो पण जग त्याच्या वेळेनुसार चालू आहे फक्त मानव त्या वेळेच्याही पुढे धावत आहे. कदाचित आज मानवच मरण्याच वय ६०-६५ वर येण्याचं कारणही हेच असेल. आपण जर या काळासोबत जगलो तर नक्कीच जास्त वर्ष जगू. काळाच्या पुढे जाणून आपण आपलं आयुष्य कमी करत आहोत. आता मूळ मुद्धा मोबाईल चा, हे व्यसन झालं आहे. खूप बारीक विचार करायला हवा. आपण आनंदात जगलो, खेळलो, बागडलो. आज परिस्थितीत तशी नाही. 
मला मी १२वी ला असताना फक्त फोन मिळाला होता स्मार्टफोन नाही. आज फक्त एक कारण आहे कोरोनाच म्हणून काय सरसकट तुम्ही लेकरांना मोबाईल घेऊन देणार आहेत का? यावर काही दुसरा पर्याय का नाही शोधत? आपण या लेकरांना कुठे घेऊन चाललो आहोत याचा जारदेखील विचार करत नाही. हे लिखाण मी कोरोना येण्याच्या खूप आधी केलं होतं पण अचानक आलेल्या संकटामुळे मी हे तुमच्यापर्यंत पोहचण्याची योग्य वेळ नव्हती. आता आपण या संकटातून बाहेर पडत आहोत एक चांगली गोष्ट आहे. पण तितकीच विचार करायला लावणारी गोष्ट देखील आहे, प्रत्येक वेळी आपण शिक्षणासाठी या आभासी जगात जाऊन शिकणार आहोत का? याला काही पर्यायी व्यवस्था करू शकतो का? विचार करायला हवा.
आज या स्मार्टफोन ला सोबत मिळाली आहे इंटरनेट ची. एकच व्यसन कमी होत का तर आता त्यासोबत हे फ्री मिळालं. जगातली कुठलीही गोष्ट या आभासी स्मार्टफोन मध्ये सहज मिळत आहे. आनंद, दुःख, नैराश्य, चिडचिड हे सर्व भाव मला एका कानात हेडफोन घातलेल्या लहान पोराच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आपण या लेकरांना आता आवरणं गरजेचं बनलं आहे. जवळपास सर्वच मुलांच्या हातात स्मार्टफोन आहे पण त्या फोन मध्ये ते लेकरू काय करत आहे हे कुणालाही माहीत नाही. तासंतास त्यात डोकं घालून बसलेलं पोरग त्यात काय करत आहे, हे आईबापाला ही माहीत नाही, कदाचित कळत नाही त्यांना त्यातलं काहीच. पोरग जेवण करतांना देखील त्यात बोटं घालत असतं. आईबापाला वाटत करत असेल अभ्यास पण ह्याच आईबापाला हे लक्षात येत नाही ज्यावेळी यांच्याकडे हा फोन नव्हता तेंव्हा जेवण करताना कधी वही आणि पेन हातात घेऊन बसलेला पहिला आहे का? विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत सर्व. 
या इंटरनेट च्या जगात मुलं नैराश्यात जात आहेत, चिडचिडे होत आहेत. अचानक येणाऱ्या एका मेसेज ला क्लिक करून हे पोर जगात कुठे भरकटत आहे याची जरा देखील जाणीव आपल्याला येत नाही. पोर्नोग्राफी सारखे व्हिडिओ सहजरित्या पहातात आणि त्याला व्यसनी पडतात. इनकॉग्नीटो सारखे प्रकार आज मला याच पोरांकडून ऐकायला मिळतात. यात जणू हिस्टरी सेव्ह राहत नाही. ओ टी टी सारख्या प्लॅटफॉर्मचा हे ८-९ वर्षांची पोर सर्रास वापर करत आहेत. गेम ऑफ थ्रोन्स सारख्या १८+ वेब सिरीज वर हे पोर बोलताना आढळत आहेत.
आज आणखी गमतीशीर म्हणावं की नाही माहीत नाही पण एक गोष्ट घडली. एका खेडेगावात गेलो होतो. पारावर चार पाच पोर मोबाईल मध्ये काहीतरी करत होते जवळ जाऊन पाहिलं तर एका डेटिंग अप्लिकेशन वर हे पोर एक पोरीला रिक्वेस्ट पाठवत होते. नेमकं यातलं कोण जाणार होत डेंटिग ला देव जाणे. खेड्यात डेंटिग वेबसाईट वर ही पोर खरच काय बरं करत असतील? हे झालं पोरांचं मग पोरी पण वापरात असणारच असं मी गृहीत धरतो. Unauthorized application हे पोर डाउनलोड करतात आणि चुकीचं पाऊल उचललं जात. नंतर याच मुळे नैराश्य येणे सारख्या गोष्टी घडतात.
शाळेच्या चार भिंतीच्या आत मिळणार शिक्षण तुम्ही या चार कोपऱ्याच्या मोबाईल मधून नाका घेऊ. वर्ष वायाला जाईल या भीतीने सर्वांनी आपल्या लेकरांना व्यसन लावलं आहे. वेळ अजूनही गेलेली नाही, शैक्षणिक वर्ष वायाला गेलं तरी चालेल पण पोराचं आयुष्य वायाला जायला नको फक्त इतकंच.
याच खेड्यात अजून एक चांगली गोष्ट मी पहिली,ऐकली चार पोर एकाच मोबाईल वर दिवसातले दोन तास सर्वांसोमोर अभ्यास करत आहे, कारण त्यांच्याकडे एकाच मोबाईल आहे.
ह्या ऑनलाइन शिक्षणामुळे आपले पोर काळाच्या खूप पुढे जात आहेत त्यांना वेळीच रोखलं पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

परत एकदा धोकेबाज मीच..!!!

धोकेबाज मी...!!!