मी प्रेम केलं हाय तिच्यावर...!!!
प्रिय जब्या, लका कुठं हाईस, मला काळ्या चिमणीची राख पाहिजी हाय. लगा ती माह्याकडं वळून बी बघत नाही. लई प्रेम करतोय राव मी तिच्यावर. दर येळला मी तिला ईचारायच्या आधीच कोणीतरी पळून घेऊन जातंय बघ. वाटलं तर अर्धी का होईना पण दे बाबा राख आता खरच गरज हाई मला. माघल चार-पाच वरीस झालं एक झालं की एक हातातून जात्यात बघ. काय कळायना म्हणून म्हणलं डायरेक्ट तुलाच गाठावं. हे बघ जब्या तुला म्हणून सांगतो, लगा ती पण मह्यावर लई प्रेम करत होती पण सालं हे पैसं वाले पोरं र लईच हरामखोर निघालं बघ. आपला गेम झाला राव. काय डोळं फाडून तिची वाट बघीतली बघ पण नाही जे व्हायचं होत तेच परत परत झालं. काय केलं नाही म्या तिच्यासाठी, आर म्या बी मस पैसं खर्चिले की तिच्यासाठी पण ह्या... लगा ती काय आपल्या हाताला लागली नाय बघ. ह्या पैसं वाल्या पोरांना सांगतोय जरा इज्जतीत राव्हा, एकांद्या दिशी तरी आमच्यासारख्याचा मार खाशीला. बरं म्या काय म्हणूतुय नेलंयच ना पळून गप करा की लगा संसार तिच्या बर, पण नाही अजून बी बाहेर तोंड मारतेत साले. म्हंजी आम्ही आता काय ब्रह्मचारीच ऱ्हायच व्हय? हे बघ जब्या आता मला तुही गरज हाय तू नाही म्हण...