मी प्रेम केलं हाय तिच्यावर...!!!

 प्रिय जब्या,

लका कुठं हाईस, मला काळ्या चिमणीची राख पाहिजी हाय. लगा ती माह्याकडं वळून बी बघत नाही. लई प्रेम करतोय राव मी तिच्यावर. दर येळला मी तिला ईचारायच्या आधीच कोणीतरी पळून घेऊन जातंय बघ. वाटलं तर अर्धी का होईना पण दे बाबा राख आता खरच गरज हाई मला.



माघल चार-पाच वरीस झालं एक झालं की एक हातातून जात्यात बघ. काय कळायना म्हणून म्हणलं डायरेक्ट तुलाच गाठावं. हे बघ जब्या तुला म्हणून सांगतो, लगा ती पण मह्यावर लई प्रेम करत होती पण सालं हे पैसं वाले पोरं र लईच हरामखोर निघालं बघ. आपला गेम झाला राव. काय डोळं फाडून तिची वाट बघीतली बघ पण नाही जे व्हायचं होत तेच परत परत झालं. काय केलं नाही म्या तिच्यासाठी, आर म्या बी मस पैसं खर्चिले की तिच्यासाठी पण ह्या... लगा ती काय आपल्या हाताला लागली नाय बघ.

ह्या पैसं वाल्या पोरांना सांगतोय जरा इज्जतीत राव्हा, एकांद्या दिशी तरी आमच्यासारख्याचा मार खाशीला. बरं म्या काय म्हणूतुय नेलंयच ना पळून गप करा की लगा संसार तिच्या बर, पण नाही अजून बी बाहेर तोंड मारतेत साले. म्हंजी आम्ही आता काय ब्रह्मचारीच ऱ्हायच व्हय? 

हे बघ जब्या आता मला तुही गरज हाय तू नाही म्हणू नगं. त्या काळ्या चिमणीला तेवढं सापडून ठेव म्हंजी झालं. लगा कॉलीज पथुर म्हणयाची काही झालं तरी मी तुहीच होणार, पण हे लगा ह्या जगात कुणावर बी भरुसा नाही ऱ्हायला बघ आता. बरं म्या म्हणतु तुमी आमच्या हिला आमच्या डोळ्यासमुर बघून बघून पटविलं इथपस्तुर बी ठीक हुत, पण लगा त्यासनी हे बी जमाना डायरेक्ट पैसं देऊन पळवायला लागले हे पोरं. म्या तिच्या साठी रात रात जगलोय, तिच्यासाठी म्या दोनाचे चार डोळं केलं राव. 

आज लईच दुख झालं बघ तिचं फुटू पाहिलं वाईट वाटलं. काय दिसत हुती लगा मी तिच्यावर प्रेम करीत हुतो तवा अन आता तिच्याकड बघू बी वाटाणा बघ.



तिचा बाप लईच शाना निघाला बघ. पैक घेऊन तिचा बाजार मांडला हाई तिच्या इज्जतीचा. तूच सांग जब्या आता मी काय करू. बरं म्या काय म्हणतु माह्यात कॉलिटी हाय ना ते कसं दिसणा तिच्या बापाला. जब्या आता मला अजून जास्त राख लागणार बघ तिच्या बापावर बी टाकतो म्हंजी त्याला बी कळलं म्या त्याच्या पोरीवर किती निखळ प्रेम केलं हाय. बघू काय झालं तर नाहीतर हाईच ही नाही तर ती....!

तुझ्या काळ्या चिमणीच्या राखेची वाट पाहणारा,

प्रवीण सानप


वरील पत्रात ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती माझी “परीक्षा" आहे.


Comments

Popular posts from this blog

परत एकदा धोकेबाज मीच..!!!

धोकेबाज मी...!!!