माझ्या विठ्ठला (पालखी सोहळा)
विठ्ठला मी तुझ्यावर नाराज हाऊ का रे ? बस झालं ना रे आता. आज लाखो भाविक स्टेटस ठेवत आहेत , प्रत्येक चित्रफीत पाहतांना अंगावर शहारे येत आहेत. भाविक त्या “शिवशाही" ला लांबूनच हात जोडत आहेत. कुणाचा तरी हात त्या गाडीला स्पर्श होतो तेंव्हा त्याचा आनंद गगनात मावणारा नसतो , डोळ्यात नकळत पाणी येत. संत तुकारामांच्या पालखीची आतुरतेनं वाट पाहणारे आम्ही , संत ज्ञानेश्वरच्या पालखीच्या दर्शनासाठी वाट मिळेल तसं धावणारे आम्ही आज फक्त मोबाईल , टी.व्ही. वर शिवशाहीत या पालख्या पाहून नतमस्तक होत आहोत. संत तुकारामांची पालखी चिंचवड ला मोरया गोसावी मंदिरात मुक्कामी मग पहाटे लवकरच H.A. मैदानाकडं प्रस्तान आम्ही इंजिनिअर लोक एवढया सकाळी फक्त याच दिवशी उठायचो. ४ चा गजर आणि लवकर आवरून दर्शन रांगेत उभे. “माऊली” नामाचा गजर अखंड चालू. दर्शन घेऊन झाल्यावर अंगात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा संचारात असे. नंतर रिंगणात धावणाऱ्या घोड्याच व पालखीच्या रथाच दर्शन , त्या रथासाठी बैलांची जोड पाहायला जायचं त्याचं दर्शन घ्यायचं. पालखीत निघालेल्या माऊलींची आवर्जून घेतलेली माहिती. आलेला प्रत्येक भाविक फुलं न फुलाची पाकळी द...