Posts

Showing posts from August, 2021

आज रक्षाबंधन नाय, मैत्रिदिन हाय लका...!!!

Image
ते वरीस धावी च व्हतं अप्पा चा संत्या अन तात्याचा किश्या लहानपणापासन एकमेकांचे दोस्त व्हते. जय विरु ची ही जोड व्हती. शाळा सुरू व्हवून दोन अडीच महिन झाले व्हते. पोरांचा अभ्यास बी चांगला चालू व्हता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुसत्या उनाडक्या करण्यात गेल्या व्हत्या. शाळेत पाहिलं धा-पंधरा दिस जरा अवघडच गेलं.संत्याच मन शाळत लागत नव्हतं. तुकडीत पोरांच्या तुलनेत पोरी कमीच म्हंजी अर्ध्याला अर्ध्याच असत्यान. संत्या अन किश्या सेमी इंग्रजी ला व्हते, ते सेमी म्हणजी काय इचरल तर अजून बी सांगता येत नव्हतं पण ते सेमी ला व्हते. दिसं जरा बरे चालले व्हते. पण शाळा सुरू व्हवून पंधरा सोळा दिस झाले तरी इंग्रजी शिकाया कोण येत नव्हतं. तसं बी पोरांना इंग्रजी चा तास म्हणलं की कटाळा यायचा. त्यो तास व्हतं नव्हता म्हणून खेळाचा तास घेत व्हते, पोरांना तेवढंच बरं वाटायचं. पण एक दिशी नवा मास्तर इंग्रजी ला येणार हाय अन त्यो मास्तर जिल्ह्याच्या ठिकाणावरून येणार हाय अस पोरांना कळलं. आता जरा पोरांची फजितीच निघणार व्हती. ती तारीख संत्या कधी बी इसरणार नाय. १ जुलै व्हता त्यो, सकाळच्या प्रार्थने च्या टायमाला सगळे पोरं पटांगणात आले...