आठवणी १० वी च्या.. !!!
दिवसच तसे होते कोण पोरग एकाद्या पोरीला बोलला की मारुसतो धुतला म्हणून समजा. आज तब्बल १२-१३ वर्षांनी भेट झाली सर्वांची, नेमकं काय बोलायचं? कसं बोलायचं? काही कळत नव्हतं. मेंदूला जरा जास्तच ताण पडत होता बऱ्याच लोकांचे चेहरे ओळखू तर येत होते पण नावं मात्र आठवत नव्हते. कोण कोणाला हळूच विचारात होत अग तो कोण आहे ग?, अरे ती कोण आहे रे? पण शेवटी परत शाळेत असल्यासारखे एकमेकांना ओळखू लागले. या ओळखी अश्याच स्मरणात राहण्यासाठी आपल्याला भेटायला पाहिजे. तसंही लोक म्हातारे होताना विसरायला लागतात. या आठवणी अश्याच ताज्या राहायला पाहिजेत. माहीत नव्हतं तेंव्हा असं भेटावं लागलं, त्या जुन्या आठवणींना अश्या प्रकारे सामोरं जावं लागतं. सकाळी सकाळी लवकर शाळेत येऊन कोण कुणाचा डेस्क उचलून घेऊन जातो, तर कोणी आपला डेस्क कुणाच्या तरी दप्तर ने पुसून काढतो. इंग्रजी च्या तासाला मुद्दामहून मराठीत एक साथ नमस्ते म्हणायचं आणि सगळ्या वर्गाने बटुळे सरांचा मार खायचा. यात मुली मात्र वाचल्या. मराठीचे वणवे सर आज आपल्यात नाहीत मात्र सकाळी राष्ट्रगीताच्या वेळी पेटीतून येणारे शब्द अजूनही कानात घुमतात. हिटलर म्हणून प्रसिद्ध असल...