“शिरसवाडी”
पुस्तक बाजारात मिळत नव्हतं, ट्विटर वर स्पेस मध्ये असाच विषय निघाला आणि अमर पवार सरांनी त्यांच्याकडे हे पुस्तक आहे आणि ते मला हे पुस्तक पाठवतो बोलले.
पुस्तक माझ्या हातात आलं, पुस्तकाबद्दल खूप ऐकलं होतं. हवा तसा वेळही मिळत नव्हता पण भेट मिळलेल पुस्तक आणि कोणीतरी आपल्याला आवर्जून पाठवलेलं पुस्तक तर वाचायलाच पाहिजे.
कालचा दिवस, मित्राची अभियांत्रिकी सेवेची मुलाखत विधानभवन पुणे ला, ठरल्याप्रमाणे मी त्याच्या सोबत गेलो. तिथं गेल्यावर मी काय करणार म्हणून “शिरसवाडी” बॅग मध्ये टाकलं. उगाच मोबाईल मध्ये टाईमपास करण्यापेक्षा वाचू थोडाफार पुस्तक असा विचार केलेला. सोबतचा फोटो विधानभवन पुणे इथला आहे. पुस्तक काल सकाळी वाचायला घेतलं आज दुपारी संपलं.
एकदा लेखक किती छान कथा लिहू शकतो आणि वाचणाऱ्याला आपल्या लेखनात गुंतवून ठेवू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे गणेश बर्गे सर.
पुस्तक वाचत असताना मी किती वेळा रडलो? मी किती वेळा भावुक झालो? मी किती वेळा आनंदी झालो? मी किती वेळा गहिवरून गेलो होतो? हे मोजू शकलो नाही. एक वेळ तर असं वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी बसून तर पुस्तक वाचत नाहीत ना? कारण विधानभवनात त्या बाकावर बसून पहिले पाच पन्नास पान वाचतांनाच माझे डोळे दोन तीन वेळा पाणावले होते. गावातले हलकेफुलक्या प्रश्नापासून दोन मोठ्या प्रश्नांची उत्तरं संपूर्ण गाव शोधत आहे.
बबनराव, त्यांची मुलगी शारदा आणि तिचा मुलगा लव याची ही कथा “शिरसवाडी”.
काल मुद्दामहून च वाचन थांबवलं विचार केला आणि थोडं एकांतात हे पुस्तक वाचायला हवं. आज मात्र वेळात वेळ काढून आणि जरा एकांतात पुस्तक परत वाचायला घेतलं आता मात्र शारदेची कहाणी वाचून मी कितीही वेळा रडू शकतो. लव आणि रूपालीची प्रेमकहाणी वाचून आनंदी होऊ शकतो. लव आणि त्याची लव्हगुरु बहीण शीतल याचे किस्से एकूण हसू शकलो.
कथा शेवटाकडे जाताना आंनद होतो, सर्व काही जुळून येत आहे असं वाटतं. लेखकाने केलेल्या लिखाणाला दाद द्यावी लागते. अगदीच शेवटी मात्र भयानक काहीतरी घडतं आणि त्यासाठी आपण हे पुस्तक नक्की वाचा.....
लव च प्रेम, त्याचा खरा बाप, आईच प्रेम, शिराई देवीचं मंदिर आणि वढ्यावरचा पूल ह्या सर्व गोष्टी च चित्र असं एका क्षणात डोळ्यासमोरून भुर्र कणं निघून जात.
गणेश बर्गे सरांनी अशीच दर्जेदार पुस्तक वाचकांसाठी लिहावीत.
शिराईदेवीच्या नावानं “चांगभलं...!!!”
फोटो: प्रविण सानप
ठिकाण: विधानभवन, पुणे

Comments
Post a Comment