*फोटो*
काय राव विसरला वाटतं आम्हाला, असं कुठं असतंय व्हय. आम्ही नाही बाबा विसरलो कुणालाही,आणि विसरणार तरी कसे ना आम्ही म्हणजे आठवण असतो बाबा सर्वांची.अन तीच जर पुसली तर मग कस होणार ना म्हणून आम्हाला सर्व आठवत आणि विसरूनही चालत नाही. कसले भारी दिवस होते ना आमचे पण मस्त पैकी मोठ्या कॅमेरा मध्ये रीळ म्हणून बसायची मज्जा काही औरच होती. मग त्या रीळ ला निगेटिव्ह म्हणायचे आणि ह्या निगेटिव्ह मधून आम्ही बाहेर पडायचो. मात्र आता या मोबाईल मध्ये आम्हाला बंद करून ठेवल आहे. कधी कधी त्या मोबाईल मध्ये इतका दम कोंडतो ना असा वाटत मारतोय की काय, त्यांनी दिले आहे कॅमेरा चे फिचर मग काय किती पण काढणार का? बाबा रे बाबा कसले कसले फोटो काढता तुम्ही वाकडे,तिकडे,साईड व्हीव,टॉप व्हीव,आणि काही काही चे तर आम्हाला नाव पण माहीत नाहीत. कधी कधी तर अस वाटतं तुम्ही फिरायला गेल्यावर डोळ्यांनी कमी पाहता आणि फोटोच जास्त काढता. काय तो आमचा काळ होतो आमच्यासाठी स्टुडिओ बनवला जायचा. मला की नाही त्या चार-पाच पोरी अंतिम वर्षाला असताना नटून फोटो काढायला यायच्या ना ते खूप आवडायचं. त्या आठवणी अजूनही तशाच ताज्या आहेत. दोन दिवसा...