आकड्यांचा खेळ "मटका"
IPL आली रे आली अरे पण इथे तर पहिलेच खेळ सुरु झाला आहे. असल्या कोरोनाच्या काळात IPL होणार आहेत तरी ठीक आहे. तसेही लोकांचे हाल होत आहेत दलाल, मध्यस्थी, ब्रोकर आणि सट्टेबाज यांचे पार वाटोळं केलं आहे ह्या कोरोनाने अरे जरा थांबा थांबा असा काही विचार करू नका असा काही झालं नाही. आज पर्यंत आपण सट्टेबाजी कुठपर्यंत ऐकली आहे तर एकादी क्रिकेट ची मॅच किंवा फुटबॉल आणि अजून असेच काही खेळ पण या कोरोनामुळे हे सर्व खेळ सध्या तरी बंद आहेत मग काय करणार हे सट्टेबाज लोक उपाशी राहायला लागले ना राव हे या वर त्यांनी मस्त प्लॅन शोधून काढला "कोरोनावर सट्टेबाजी". आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन हो त्यांनी आता कोरोनावर पण सट्टेबाजी सुरु केली आहे. भरमसाठ पैसे काढत आहेत हे लोक.
आकड्यांचा खेळ म्हणलं कि आपल्याला आठवत IPL किंवा रोज खेळल्या जाणाऱ्या लॉटरी. यात सर्व आकडे असतात ना कुठलं अक्षर ना कुठलं वाक्य त्याच खेळात आता अजून एक नवा खेळ आला आहे कोरोना नावाचा ह्यात पण नुसते आकडे असतात. आणि या आकड्यावर आज जुगार खेळला जात आहे. रोज नवे आकडे येत आहेत तसा यांचा धंदा जोरात होत आहे. हे सर्व आपल्या विचार करण्याच्या पलीकडे आहे. रोज येणाऱ्या कोरोना च्या आकड्यावर बोली लावली जात आहे. जवळपास पूर्ण जगभरात या कोरोना रोगाने हातपाय पसरलेले आहेत. मग हि तर आंतरराष्ट्रीय सट्टेबाजी झाली. एकट्या भारताचा विचार केला तर प्रत्येक राज्याचा आणि त्यात प्रत्येक जिल्ह्यात रोज आकडे बदलत आहेत.
तास विचार केला तर हे किती वाईट आहे जर कोणी आज जास्त रुग्ण वाढणार म्हणून पैसे लावले असतील तर तो देवाकडे एकाच मागणे करत असेल देवा आज आपला आकडा पार होऊ दे. कदाचित देव पण त्याच ऐकत आहे कि काय? आपल्याला नेहमी वाटत आपण अद्ययावत (updated) अहोत आपण जगासोबत चालत आहेत पण हे जग मात्र वेडीवाकडी वळणे घेत पुढे जात आहे. आपण हा असला विचार देखील करू शकत नाही.
हि झाली गोष्ट रुग्ण वाढीवरील सट्टेबाजीची पण यात अजून एक प्रकर तर खूपच भयंकर आहे रोज मृत्यूवर पण हे लोक सट्टा खेळतात आता मात्र डोक्यात मुंग्या आल्या. कोणाच्या तरी घरचा व्यक्ती आज जिवंत नाही आणि हे लोक त्याची पार्टी करत आहेत त्याचा आनंद घेत आहेत आणि अजून उद्याचा आकड्याचा विचार करत आहेत. खरंच आपण पृथीवरी सर्वात बुद्धुमान प्राणी आहोत कि फक्त प्राणी आहेत हेच समजत नाही. प्राणी नको म्हणायला जनावर हा शब्द सुद्धा यांना योग्य नाही.
माणसाच्या मनात चांगले किंवा वाईट विचार येतात पण कृती करताना चांगली करायची कि वाईट हे तो स्वतः ठरवत असतो. आपण नेहमी म्हणतो ज्या दिवशी स्वतःच्या घरात हि घटना घडेल त्या दिवशी समजलं त्याला पण नको असा विचार करायला आपण कारण त्या स्वतःच्या घरातील एका मृत्यूने सुद्धा हे लोक कदाचित आनंदीच असतील. देवा यांना बुद्धी नको देऊ या लोकांची बुद्धी कमी करता येते का पहा तेवढं?
Comments
Post a Comment