परीक्षा तुम्ही आणि परत परीक्षा
प्रत्येक वेळी मलाच टोचून बोलता राव तुम्ही. निर्णय घ्यायचे कोणीतरी आणि शिव्या खायच्या आम्ही हे काही बरोबर नाही. आई ज्याप्रमाणे सर्व लेकरांसाठी समान असते तशीच मी पण आहे. मला पण समजतंय रे सर्व तुम्ही लाखो लोक माझ्यावर प्रेम करता आणि हे अजून वाढतंच चाललं आहे. आता मला याचा खूप ताण पडत आहे.
होय मी MPSC आहे, मागच्या काही दिवसात तुमची झालेली मनस्थिती मला चांगली माहीत आहे. खूप सारी पोरं भयंकर तणावात जगत आहेत. काहींचा अभ्यास होत नाही तर काही आता तो करतच नाहीत.
आज अचानक माझ्यावर प्रेम करणारा नामु (नामदेव) मला भेटला, खूप रडला माझ्याजवळ आता कदाचीत ही शेवटची भेट असणार अस बोलत होता. मागच्या ३ वर्षांपासून माझ्यावर खूप प्रेम करणारा आज असा अचानक का बोलत असेल बरं. खूप अभ्यासू होता तो, मागच्या वेळी जवळपास अधिकारी फिक्स होता. त्यावेळी सुद्धा असाच रडून मोकळा झाला होता तो, मी तरी काय करणार ना waiting list नावाचा प्रकार पाहिजे असं मला पण वाटत, तो माझा हक्क काही लोकांमुळे मला मिळाला नाही. मला असे तुम्ही उदास होऊन बसलेले अजिबात पाहवत नाही. नाम्या मला बोलला होता पुढच्या वर्षी आपलं फिक्स बरं का...! मी पण मनोमन खुश झाले होते. मला नव्हतं माहीत नाम्या असा मला सोडून जाईल. आज त्याच्या पेक्षा जास्त दुःख मलाच होत आहे.
मला माहित आहे महाराष्ट्रातील जवळपास सर्व लोक माझं नाव जरी उच्चरले तरी मला टोचून बोलतात, तुम्ही देता रे सोडून पण कधी माझा विचार केला आहे का? मला किती दिवस ते सहन करावा लागत? मला पण वाटत आपण सुद्धा आता अपग्रेड झालं पाहिजे, काळानुसार बदललं पाहिजे पण काही थोड्याश्या लोकांमुळे प्रत्येक वेळी मांजर आडवी जाते. काही संघटना स्थापन होतात त्यांचा विरोध होतो,काही लोक आंदोलन करतात, तुम्ही माझं काय म्हणणं आहे ते कधीतरी ऐकून घेतलं आहे का?
जे आज अधिकारी झाले आहेत ते माझ्यामुळे झाले आहेत आणि ते सुद्धा मला सोडून गेले, माझा जरा सुद्धा विचार येत नाही त्यांना. मी सुद्धा त्यांच्या वर मनापासून प्रेम केलं होतं. कधीतरी त्यांनी एकत्र यावे माझ्या नवनिर्मानासाठी पण असं होताना दिसत नाही याचं दुःख आहे.
आज नाम्या ने मला सोडलं असेच अजून सोडतील आणि आपल्या स्वप्नाची सखा रांगोळी करतील. मलाही वाटतं प्रत्येक गोष्ट वेळेतच व्हावी,पण हे कोर्ट आणि MAT मूळे मला सुद्धा कोर्टाची पायरी चढावी लागली. असतील काही त्रुटी सामंजस्याने सोडवू ना सर्वच. मागच्या काही दिवसात जेवढा तुम्हाला त्रास सहन करावा लागला ना तेवढाच मला सुद्धा केला आहे. कोरोनानी सर्वांचेच आयुष्य थोडेफार का होईना ढासळल आहे, मग यात मी काशी वाचणार.
मी समजू शकते तुम्ही जीवच रान करून अभ्यास केला होता परीक्षा मे महिन्यात होणार होती,पण अचानक आलेल्या या जागतिक संकटात आपण सापडलो आणि पुढच्या तारखा पडत गेल्या. आता २० सप्टेंबर ही तारीख अंतिम म्हणून झालेली. माझे बरेच चाहते पुण्यासारख्या ठिकाणी तयारीसाठी गेले देखील आहेत आणि काल अचानक अजून एक मेसेज त्यांना मिळाला खूप लोकांच्या अक्षरशः मी शिव्या खाल्ल्या. काही राजकीय कारणामुळे, काही सामाजिक गोष्टीमुळे या नवीन तारीखा येत आहेत हे सर्व आता मला सुद्धा सहन होत नाही, माझ्या नाम्या सारखे कितीतरी लोक मला सोडून जात आहेत, ह्या सर्व गोष्टी चा आता विचार केला पाहिजे. सरकार म्हणून सरकार त्यांची बाजू मांडत आहे. सामाजिक कार्यकर्ते त्यांची बाजू मांडत आहेत, पण माझ्या नाम्याला आणि मला काय हवं आहे हे कोणीही विचारत नाही.
असो,नाम्या तू मला असा सोडून जाऊ नको मी तुझ्यावर प्रेम करत राहील.
खूप छान सर
ReplyDeleteधन्यवाद🙏
DeleteSuperb sir
ReplyDeleteThanks🙏
Deletemast khup bhari
ReplyDeleteधन्यवाद🙏 आभारी आहे.
DeleteSuperb Broo
DeleteThanks मित्रा 🙏
DeleteHeart touching...very creative writing ..
ReplyDeleteThank you so much 🙏
Deleteअप्रतिम भाऊ👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद प्रिय मित्रा🙏
DeleteKadak sir
ReplyDeleteधन्यवाद तरंगे साहेब 🙏
Deleteछान लेख सर।
ReplyDeleteआभारी आहे 🙏
Deleteअप्रतिम गुरू..
ReplyDeleteआपलाच आशीर्वाद धन्यवाद 🙏
Deleteअप्रतिम 👌👌
ReplyDeleteThanks🙏
Delete