ऑनलाइन शिक्षणाच्या आईचा घो...!!!
आपण चुकतोय, खूप मोठं संकट ओढवून घेत आहोत याची जरादेखील कल्पना आपल्याला नाही. लेकरांच्या बापानो आणि आयानो कदाचित वेळ हातात असेल, “कदाचित". एक वाईट व्यसन तुमच्या लेकरांना लागलेलं आहे. आपले दिवस आठवा, आपल्या हातात तो मोबाईल आपल्या वयाच्या कितव्या वर्षी आला ते आठवा. काळ बदलत नसतो आपण बदलत असतो. आजच जग खूप फास्ट झालं आहे आपण म्हणतो पण जग त्याच्या वेळेनुसार चालू आहे फक्त मानव त्या वेळेच्याही पुढे धावत आहे. कदाचित आज मानवच मरण्याच वय ६०-६५ वर येण्याचं कारणही हेच असेल. आपण जर या काळासोबत जगलो तर नक्कीच जास्त वर्ष जगू. काळाच्या पुढे जाणून आपण आपलं आयुष्य कमी करत आहोत. आता मूळ मुद्धा मोबाईल चा, हे व्यसन झालं आहे. खूप बारीक विचार करायला हवा. आपण आनंदात जगलो, खेळलो, बागडलो. आज परिस्थितीत तशी नाही. मला मी १२वी ला असताना फक्त फोन मिळाला होता स्मार्टफोन नाही. आज फक्त एक कारण आहे कोरोनाच म्हणून काय सरसकट तुम्ही लेकरांना मोबाईल घेऊन देणार आहेत का? यावर काही दुसरा पर्याय का नाही शोधत? आपण या लेकरांना कुठे घेऊन चाललो आहोत याचा जारदेखील विचार करत नाही. हे लिखाण मी कोरोना येण्याच्या खूप आ...