रानगठा विरुद्ध रानगवा

रानगठे आहेत राव तुम्ही. मला रानगवा म्हणता पण तुम्ही खरे रानातले. माझी जरा चूकच झाली, प्राणाला मुकलो मी आज. डिप्रेशन, एंझायटी, पॅनिक, प्रेशर हे सर्व तुम्हाला जस येत तसचं आम्हाला देखील येत. माणूस हा देखील एक प्राणी आहे हे तो विसरत आहे. आम्ही त्यांच्यावर हल्ले करतो असं सारखं बोंबलत असतो.
लहान असताना आई रागावल्यावर मी दूर निघून जाणार असं नेहमी म्हणत होतो. आज तेच झालं. एकदा आईला विचारलं की आपण का नाही जाऊ शकत शहरात ते लोक सुद्धा एक प्राणीच आहेत जसे आपण आहोत. आई त्या वेळी जास्त काही बोलली नाही पण आज समजलं ती काहीच का बोलली नव्हती. मला नेहमी एक प्रश्न पडायचा या पृथ्वीवर सर्व जीव एक प्राणी म्हणूनच जन्माला येतात मग असे वेगवेगळे का राहत असतील? आम्ही माणसापासून दूर गेलोय की माणसांनी आम्हाला दूर केलाय काही समजत नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्या मध्ये जशी दरी निर्माण झाली आहे तशीच तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. बरं मी जसं जसं मोठा होत होतो तसं तसं शहराकडे जाण्याची इच्छा वाढत होती. चार पाच दिवसापूर्वी आम्ही सर्वच जंगलात भटकत होतो, मस्ती करत होतो, नंतर जाम थकलो म्हणून जरा विश्रांती केली कधी डोळा लागला कळलंच नाही. जाग आली तेंव्हा एकटाच होतो. आज मानातुन वाटत होतं एकदा शहर पाहूनच यावं नेमकं माणूस म्हणजे तरी काय चीज आहे पाहावी. आपल्या आणि त्यांच्या मध्ये ही दरी तयार झाली आहे ती कमी करता येते का याचा विचार त्याने आणि आपण करावा.
माझे सहकारी दूरवर कुठे तरी दिसत होते त्यांच्या हंबरण्याचा आवाज येत होता, हीच ती वेळ म्हणून मी शहराचा रास्ता धरला. दोन तीन दिवस खूप मजेत गेले. जंगलात बऱ्याच नवीन प्राण्यांची ओळख झाली. खुप खायला घातलं. आता शहरत अर्ध्या एक दिवसात पोहचणार म्हणून खुश होतो. तो दिवस उजाडला मी शहरात प्रवेश केला. मनुष्यप्राण्यांनी खूप प्रगती केली आहे हे पाहून खूप आनंद झाला. शहरातले घरे पहिली, घरं कसली बिल्डिंग पहिल्या. जरा भटकलो इकडे तिकडे भूक लागली म्हणून काही मिळतंय का पाहिलं तर माझ्याच सारखी काही जनावर एक उकिरड्यावर काहीतरी खात होती मलाही पर्याय नव्हता. शिळ्या भाज्या आणि पस्टिक मध्ये गुंडाळलेल थोडं अन्न पोटात कसंबसं टाकलं. बऱ्याच लोकांना मी रानगवा आहे समजलं देखील नाही, तुमच्याकडे तो रेडा असतो तसाच काहीसा दिसणारा मी.
थोडासा आणखी शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न मी केला. एक इवलेस पोर मला पाहून दचकलं आणि गौर गौर म्हणून ओरडायला लागलं. मला अंदाज आला ह्या पोरांनी कदाचित मला ओळखलं आहे. लोकं माझ्याकडं पाहायला लागली. मला आनंद वाटायला लागला. आता आपण यांच्या सोबत चार गोष्टी बोलून एकत्र राहण्याचा विचारायला हवं असं वाटत होतं. पण माझ्या जवळ कोणीच यायला तयार नव्हतं जमलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांच्या हातात मोबाईल फोन होते. कोणी फोटो घेतोय तर कोण विडिओ. माझ्या लक्षत आलं असाच लहान असताना ते नॅशनल डिस्कवरी वाले आले होते त्यांनी आमचे फोटो आणि विडिओ काढले होते म्हणूनच आज एका बारक्या पोराला मी ओळखू आलो. थोड्या वेळात लोक काढ्या आणि लोखंडी सळया घेऊन आले. मला हा प्रकार जरा विचित्रच वाटला. मी या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे मला हुसकावून लावत आहेत. काही लोक वनविभागाला फोन करून बोलावू लागले. वनविभागाचे लोक अर्ध्याच तासात आले. कधीपासून आपला वनविभाग एवढा फास्ट झाला? हातात एक मोठं इंजेक्शन घेऊन आलेला माणूस पाहून मला भीती वाटू लागली. मला कोणालाही इजा करायची नाही. मी माझे प्राण वाचण्यासाठी तिथून निघायचा प्रयत्न केला. हजारोंच्या संख्येने लोक मला पाहण्यासाठी जमायला लागली पण तितक्याच संख्येने हातात काठ्या लाठ्या घेऊन मला मारण्यासाठी देखील जमू लागली. 
माझी जरा चूकच झाली नको तितका जवळ आलो मी तुमच्या, वनविभागाचे काम वनात्याला प्राण्याचं रक्षण, संवर्धन करणे आहे. एक भलं मोठं इंजेक्शन पाहून मला आता तो माणूस यम वाटत होता. मी माझ्या परीने वाचवण्याचा प्रयत्न केला. पाच तास मला तुम्ही लोकांनी मला पळवलं पण मी साधे एक वेळा शिंग सुद्धा हलवलं नाही. मला जर वाटलं असतं तर मी कित्तेक लोक जखमी केले असते, संपत्तीच नुकसान केलं असत पण असे गुण माझ्यात नाहीत. मला वाटलं असतं तर त्या यमाला देखील यमसदनी मी पाठवलं असत.
त्यादिवशी तुम्ही मला खूप पळवलं, मी थकलो तेंव्हा मला एंझायटी चा झटका येऊन गेला. खूप ताण आला होता मला. असहाय्य वेदना झाल्या.
मला तुम्हाला पहायची इच्छा होती ती मी पूर्ण केली. तुम्ही आम्हाला तर कधीही पाहून शकता. एका बंद पिंजऱ्यात आम्हाला तुम्ही ठेवून हवं तेंव्हा पाहू शकता. बंद पिंजऱ्यापर्याय देखील यायचं नसेल तर घराचा टी.व्ही. आहेच. एक बटन दाबलं की आम्ही तुम्हाला दिसतो.
पण खरंच एकदा मी माफी मागतो माझी जरा चूकच झाली. नको होतं यायला तुमच्या शहरात, पण तुम्ही मात्र आवर्जून या बरं का आमच्या जंगलात. आम्ही नाही पळवणार तुम्हाला. आणि एक विचार नक्की करा पहा जमत असेल तर सर्व प्राण्यांना एकत्र राहायला त्यात तुम्ही देखील आलात कारण तुम्ही पण मनुष्य“प्राणीच" आहेत.
प्राणी:- प्रविण सानप

Comments

Popular posts from this blog

परत एकदा धोकेबाज मीच..!!!

धोकेबाज मी...!!!