Posts

Image
मित्रा , मी आहे ना...! Everything is fine रे बाबा..! आपल्या आयुष्यात आलेली मित्र नावाची ही माणसं काही उगाच आलेली नसतात....... त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं..... त्यांच्याशी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात..... नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमकी याच व्यक्तीशी आपली ओळख का होते ? याच उत्तर कोणीही देऊ शकत नाही........ जे हे मैत्रीचं नाती तयार होतात ते आपण जीवापाड जपावं...... आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही मैत्री...... रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो , पण मैत्रीच्या नात्यात तसं नसतं...... It's Mutual Relation..... मन जुळलं , विचार जुळले की मैत्रीचं नातं तयार होत...... जे बंध खूप घट्ट असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत...... अथवा खूप वाईट परिस्थितीतुन जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे “मी आहे ना” हे शब्द संजीवनी सारखे काम करतात...... अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं...... पैश्यांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो...... नात्यांनी समृद्ध होणं तितकं...

आठवणी १० वी च्या.. !!!

Image
  दिवसच तसे होते कोण पोरग एकाद्या पोरीला बोलला की मारुसतो धुतला म्हणून समजा. आज तब्बल १२-१३ वर्षांनी भेट झाली सर्वांची, नेमकं काय बोलायचं? कसं बोलायचं? काही कळत नव्हतं. मेंदूला जरा जास्तच ताण पडत होता बऱ्याच लोकांचे चेहरे ओळखू तर येत होते पण नावं मात्र आठवत नव्हते. कोण कोणाला हळूच विचारात होत अग तो कोण आहे ग?, अरे ती कोण आहे रे? पण शेवटी परत शाळेत असल्यासारखे एकमेकांना ओळखू लागले. या ओळखी अश्याच स्मरणात राहण्यासाठी आपल्याला भेटायला पाहिजे. तसंही लोक म्हातारे होताना विसरायला लागतात. या आठवणी अश्याच ताज्या राहायला पाहिजेत. माहीत नव्हतं तेंव्हा असं भेटावं लागलं, त्या जुन्या आठवणींना अश्या प्रकारे सामोरं जावं लागतं. सकाळी सकाळी लवकर शाळेत येऊन कोण कुणाचा डेस्क उचलून घेऊन जातो, तर कोणी आपला डेस्क कुणाच्या तरी दप्तर ने पुसून काढतो. इंग्रजी च्या तासाला मुद्दामहून मराठीत एक साथ नमस्ते म्हणायचं आणि सगळ्या वर्गाने बटुळे सरांचा मार खायचा. यात मुली मात्र वाचल्या. मराठीचे वणवे सर आज आपल्यात नाहीत मात्र सकाळी राष्ट्रगीताच्या वेळी पेटीतून येणारे शब्द अजूनही कानात घुमतात. हिटलर म्हणून प्रसिद्ध असल...

“शिरसवाडी”

Image
पुस्तक बाजारात मिळत नव्हतं, ट्विटर वर स्पेस मध्ये असाच विषय निघाला आणि अमर पवार सरांनी त्यांच्याकडे हे पुस्तक आहे आणि ते मला हे पुस्तक पाठवतो बोलले. पुस्तक माझ्या हातात आलं, पुस्तकाबद्दल खूप ऐकलं होतं. हवा तसा वेळही मिळत नव्हता पण भेट मिळलेल पुस्तक आणि कोणीतरी आपल्याला आवर्जून पाठवलेलं पुस्तक तर वाचायलाच पाहिजे. कालचा दिवस, मित्राची अभियांत्रिकी सेवेची मुलाखत विधानभवन पुणे ला, ठरल्याप्रमाणे मी त्याच्या सोबत गेलो. तिथं गेल्यावर मी काय करणार म्हणून “शिरसवाडी” बॅग मध्ये टाकलं. उगाच मोबाईल मध्ये टाईमपास करण्यापेक्षा वाचू थोडाफार पुस्तक असा विचार केलेला. सोबतचा फोटो विधानभवन पुणे इथला आहे. पुस्तक काल सकाळी वाचायला घेतलं आज दुपारी संपलं. एकदा लेखक किती छान कथा लिहू शकतो आणि वाचणाऱ्याला आपल्या लेखनात गुंतवून ठेवू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे गणेश बर्गे सर. पुस्तक वाचत असताना मी किती वेळा रडलो? मी किती वेळा भावुक झालो? मी किती वेळा आनंदी झालो? मी किती वेळा गहिवरून गेलो होतो? हे मोजू शकलो नाही. एक वेळ तर असं वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी बसून तर पुस्तक वाचत नाहीत ना? कारण विधानभवनात त्या बाकावर बसू...

आज रक्षाबंधन नाय, मैत्रिदिन हाय लका...!!!

Image
ते वरीस धावी च व्हतं अप्पा चा संत्या अन तात्याचा किश्या लहानपणापासन एकमेकांचे दोस्त व्हते. जय विरु ची ही जोड व्हती. शाळा सुरू व्हवून दोन अडीच महिन झाले व्हते. पोरांचा अभ्यास बी चांगला चालू व्हता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुसत्या उनाडक्या करण्यात गेल्या व्हत्या. शाळेत पाहिलं धा-पंधरा दिस जरा अवघडच गेलं.संत्याच मन शाळत लागत नव्हतं. तुकडीत पोरांच्या तुलनेत पोरी कमीच म्हंजी अर्ध्याला अर्ध्याच असत्यान. संत्या अन किश्या सेमी इंग्रजी ला व्हते, ते सेमी म्हणजी काय इचरल तर अजून बी सांगता येत नव्हतं पण ते सेमी ला व्हते. दिसं जरा बरे चालले व्हते. पण शाळा सुरू व्हवून पंधरा सोळा दिस झाले तरी इंग्रजी शिकाया कोण येत नव्हतं. तसं बी पोरांना इंग्रजी चा तास म्हणलं की कटाळा यायचा. त्यो तास व्हतं नव्हता म्हणून खेळाचा तास घेत व्हते, पोरांना तेवढंच बरं वाटायचं. पण एक दिशी नवा मास्तर इंग्रजी ला येणार हाय अन त्यो मास्तर जिल्ह्याच्या ठिकाणावरून येणार हाय अस पोरांना कळलं. आता जरा पोरांची फजितीच निघणार व्हती. ती तारीख संत्या कधी बी इसरणार नाय. १ जुलै व्हता त्यो, सकाळच्या प्रार्थने च्या टायमाला सगळे पोरं पटांगणात आले...

माझ्या विठ्ठला (पालखी सोहळा)

Image
विठ्ठला मी तुझ्यावर नाराज हाऊ का रे ? बस झालं ना रे आता. आज लाखो भाविक स्टेटस ठेवत आहेत , प्रत्येक चित्रफीत पाहतांना अंगावर शहारे येत आहेत. भाविक त्या “शिवशाही" ला लांबूनच हात जोडत आहेत. कुणाचा तरी हात त्या गाडीला स्पर्श होतो तेंव्हा त्याचा आनंद गगनात मावणारा नसतो , डोळ्यात नकळत पाणी येत. संत तुकारामांच्या पालखीची आतुरतेनं वाट पाहणारे आम्ही , संत ज्ञानेश्वरच्या पालखीच्या दर्शनासाठी वाट मिळेल तसं धावणारे आम्ही आज फक्त मोबाईल , टी.व्ही. वर शिवशाहीत या पालख्या पाहून नतमस्तक होत आहोत.   संत तुकारामांची पालखी चिंचवड ला मोरया गोसावी मंदिरात मुक्कामी मग पहाटे लवकरच H.A. मैदानाकडं प्रस्तान आम्ही इंजिनिअर लोक एवढया सकाळी फक्त याच दिवशी उठायचो. ४ चा गजर आणि लवकर आवरून दर्शन रांगेत उभे. “माऊली” नामाचा गजर अखंड चालू. दर्शन घेऊन झाल्यावर अंगात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा संचारात असे. नंतर रिंगणात धावणाऱ्या घोड्याच व पालखीच्या रथाच दर्शन , त्या रथासाठी बैलांची जोड पाहायला जायचं त्याचं दर्शन घ्यायचं. पालखीत निघालेल्या माऊलींची आवर्जून घेतलेली माहिती. आलेला प्रत्येक भाविक फुलं न फुलाची पाकळी द...

परत एकदा धोकेबाज मीच..!!!

Image
  दोन दिस झालं कळलं त्वा नवा लॅपटॉप घेतला म्हणून , पप्या इसरला लका मला . तरी तुला सांगत व्हतो . नग घेऊ नवा पण छा ... तू म्हव कव्हा ऐकणार नाय . लका आठीव ते दिवस काय हालत व्हती तुही . काम्पूटर साठी कुणाकडं बी पाळायचास ह्याचा घी त्याचा घी मग काम पुर कर . एक प्रियसी प्रियकराला ईचाराती व्हय र तू मला कधी सोडून तर जाणार नाय ना ? तव्हा त्यो प्रियकर तिला म्हणतु कधी म्हणजी कधी म्हणजी कधी च जाणार नाय . पण जे व्हायचं तेच व्हतं अन त्वा बी तेच केलंस . लका तुह्या हातात आलो तव्हा म्हयात खरच अजिबात जीव नव्हता . त्वा मला नवा जनम दिलंस . तव्हाच ठरीलं व्हतं आता ही साथ शेवटपथुर . पण लका अजून जीव हाय माह्यात अन तू मला सोडून दिलंस त्या प्रियसी सारखं . एक वचन दिलंत त्वा मला आज त्याचीच आठवण करून द्यायला आलो हाय . “ त्वा जरी नवा कॉम्प्युटर घेतला तरी मला इसरणार नाय ". त्यो दिवस मला अजून बी आठवतो धूळ खात पडलेलो मी अचानक तुह्या हातात पडलो . पहिल्यांदा वाटलं उगाच आलो ...