नास्तिक देव
का रे देवा तू स्वतःलाच नास्तिक का बनवून घेत आहेस. तू तुझे दार का बंद केले आहेस. पाप- पुण्य हे शब्द कोणी तयार केले आहेत? आज जगातील लोक तुझ्याकडे ढुंकून पण पाहत नाहीत तुझी रोज पूजा करणारा पुजारी पण तुझ्याकडे येत नाही हल्ली. हे बघ देवा हे असेच चालू राहील तर सर्व जग नास्तिक बनून जाईल आणि पाप-पुण्य, बरोबर-चूक, वाईट-चांगले,इ. असे अनेक शब्द फक्त पुस्तकातच पाहायला मिळतील. दोन चार दिवसापूर्वी एक बातमी ऐकली आई ला कोरोना नाही पण जन्माला आलेल्या बाळाला कोरोना झाला आहे. का त्या मातेने तुझ्याकडे हात पसरावेत आणि काय त्या बाळाने पाप केले होते. एक तर सांगून तरी टाक अजून किती लोकांचा बळी तुला घ्यायचा आहे. म्हणजे लोक बिनधास्त जगातील तरी, सध्या कसल्या तरी ओझ्या खाली असल्याप्रमाणे जगत आहेत. तुमची 33 कोटी लोकसंख्या आहे असे ऐकले आहे या पैकी कोणालाच मानावाबद्दल सहानुभूती नाही का रे, की तिथे पण लोकशाही प्रमाणे चालते सर्व ज्याचे संख्याबळ जास्त त्याच्या मनाप्रमाणे तसे असेल तर खरच मानव जातीच काहीच खार नाही. तू तर पहातोसच पृथ्वीवर कसे राडे होतात ते आणि असे काही तिकडे असेल तर लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा. होऊन जाऊदे ना या विज्ञानाच्या रूपाने एकदा चमत्कार, तुला वाटत असेल हे लोक स्वतःला वाचवण्यासाठी काहीच करत नाहीत पण असे नाही इथे सर्वांचे प्रयत्न चालू आहेत,पण यात त्यांना तुझी साथ हवी आहे. हे बघ देवा इथे एखादे यंत्र जरी घेतले तरी त्याची पूजा करतात पण जर ह्या विषाणूचा विचार जर तू लवकर नाही केलास तर मात्र सर्व लोक नास्तिक होतील.
नकोय आम्हाला हे २०२० साल अजिबात नको आहे जसे सुरू झाले आहे तसे काही ना काही वाईट घडत आहे. देवा कमीत कमी देवळात जायची सवय राहावी म्हणून तरी ते तुझं दार उघड नाहीतर लोक तुला विसरून जातील. त्या मंदिरात त्या दगडात तू भलेही नसशील पण काही लोकांना तिथे शांती,प्रसन्नता मिळते तर काही लोकांचा तणाव दूर होतो. आज मात्र तू त्याच लोकांना नास्तिक बनवतं चालला आहेत. पहा लवकर काही होत असेल तर..🙏

Comments
Post a Comment