तिकडचा आत्मा
काऊन नको आहे बे तुम्हाला ही जिंदगी? जिथं हाये तिथं गप जगा ना इकडं पहिलेच लै कचरा झालेला हाई. आता तुम्ही म्हनतान हे कोण अन कुठून बोलताय? हाव हाव मी आबा होई आबा अन मी इकडून लांबून बोलत हाय. आम्ही श्यान खाल्लं अन इथं आलो. आता जरा माघ जाऊन सांगतो, मी बी तुमच्यातलाच एक व्हतो. दिसभर काम करून जीवाला चार घास खात बी व्हतो, एक वरीस पाऊस कमीच झाला. सावकाराकडनं पाच पन्नास हजार रुपय कर्ज घेतल अन म्हवा यिषय संपला. ते टेन्शन का काय म्हणत्यात ते मला आलं. पण ते काय असतं ते काय मला समाजल नाही बघा. अन मंग काय जे सगळेच करत्यात तेच म्या बी केलं “आत्महत्या". म्हणलं व्हत तिथून सुटणं अन ते टेन्शन जाईन पण कसलं काय? ते अजूनच वाढलं पण आता इथं अजून एक बऱ्या आत्महत्या करायचा इचार बी करू शकत नाही बघा. त्यो ऑप्शन नाही बघा इकडं. खरं सांगू तर म्या चुकीच्या इभागात आलो हाय. तुमच्या इकडं कसं येगयेगळे इभाग असतेत पुलीस इभाग, तहसील इभाग तस इथं बी इभाग हाईत शूर मरण आलेला इभाग,म्हातार व्हावून मरण आलेला इभाग, अपघातात मरण आलेला इभाग आणि आमचा आत्महत्या वाला इभाग. आमच्या इभागाला ना बाकीचे लोकं खालचं समाजतेत,आम्ही पळपुटे,भित्...