कोरोना २.०
नमस्कार मंडळी, कसे आहात विचारण्यात काहीच अर्थ नाही. खूप त्रास दिला ना मी तुम्हाला. मला पण खूप वाईट वाटलं तुमचे हाल पाहून. पण मी तरी काय करणार, आता तुम्ही म्हणता काय कुठून आला हा कोरोना? तुम्ही नाही का एखाद्याला म्हणत तू काय ढगातून पडलास काय? तसाच मी काही ढगातून पडलेलो नाही बाबांनो मी पण जन्म घेतला आहे. तुमची जशी निर्मिती केली जाते तसाच मला पण तयार करण्यात आले आहे. कधी कधी वाटत राव मी चुकीच्या ठिकाणी जन्म घेतला आहे. दुसऱ्या ग्रहावर जन्माला आलो असतो तर कसं मी यानात फिरलो असतो मज्जा केली असती. पण तुम्ही पण काही कमी नाही केलं, इथं पण मी विमानातून प्रवास केला, रेल्वेत बसून प्रवास केला. पृथ्वीवरचे लोक जरा खतरनाकच आहेत राव. जरा जास्तच डोकं लावतात मला खूप साऱ्या ठिकाणी फिरायचं होत पण तुम्ही ह्या सर्व वाहतुकीच्या सेवा बंद करून टाकल्या. मला काही या ठिकाणी जन्म घेण्याची अजिबात रस नव्हता पण तुमच्यापैकीच काही लोकांनी बंद बाटलीतल्या
या जीवाला डिवचल आणि मला जन्म दिला, नाव दिलं, काही ठिकाणी वाढीसाठी पोषक वातावरण तयार केल. कधी कधी मला माणसाचं कौतुक कराव वाटत पण कधी कधी त्याची दैनी अवस्था पाहून दुःख देखील होत. अरे किती प्रयोग करणार तुम्ही लोक, जगण्यासाठी लागणारे प्रयोग करा ना तुम्ही उगाच भानगडी करत बसता राव.मला वाटलं नव्हत मी कोणाला सापडलं पण काय काय आणि किती प्रयोग केले माझ्यावर आणि शेवटी मला शोधून काढलच. बरं ते काढलच पण माझे लई हाल केले राव तुम्ही कसले कसले प्रयोग केले तुम्ही माझ्यावर माझा पुरता घाम काढला. कोणी केमिकल वापरतंय, कोणी गरम पाणी तर कोणी अजून काय? माझ्या अंगाची पार लाही लाही केली. माझा रंग जन्माला आलो तेंव्हा काहीसा वेगळा होता आता पार वेगळा करून टाकला आहे. बस मला जायचं आहे आता दूर कुठेतरी निघून. मी लवकरच गेलो असतो हो पण माझ्या जन्माला येण्यापूर्वी खूप सारे प्रयोग केले माझ्यावर मग मी पण रावणासारखा १० तोंड घेऊन जन्माला आलो. पण शेवटी त्याचाही अंत झाला तसाच माझा देखील होईल.फक्त तुम्ही प्रयत्न करत रहा आजवर एवढे प्रयोग केले अजून थोडे करा. पण खरं सांगू बऱ्याच लोकांना बरंच काही शिकवलं आहे मी, किती छोटा आहे मी साध्या डोळयांनी दिसत देखील नाही पण सुसाट सुटलेल्या माणसाला मी जरा धिम केलं.स्वतःसाठी जग अस सांगितलं आहे. तु दिसायला खूप मोठा आहेस पण आता कोणाला काही शिकवत बसू नकोस स्वतःच स्वतःला शिकावं म्हणजे मी लवकर जाईल. आणि हो शेवटी जाता जाता एवढंच सांगणं आहे आमच्या सारख्या जीवांना त्या बटल्यातच बंद राहुद्या, आमच्यावर जरा प्रयोग कमी करा नाहीतर आहेच कोरोना-२.

Comments
Post a Comment