तो आमचा हक्क आहे
आज सरकारने एक हक्क मात्र नक्की गमावला,मत मागण्याचा. कुठे आहे कोरोना, कोणाला झाला आहे तो. आज एक धडधाकट माणूस रडत आहे फक्त आपल्या स्वतःच्या घरी जाण्यासाठी. या लोकांना माहीत देखील नाही हे कॉरंटईन आहे काय. ना कधी अनुभवलेला ना कधी ऐकलेला हा शब्द अचानक आयुष्यात आला. सरकाने सांगितले आहे १४ दिवस कॉरंटईन राहा. पण मागील १४ दिवसापासून पेक्षा जास्त दिवस झाले हे लोक चालत,रंगडात आहेत.कुठे आहे हा कोरोना कदाचीत तो या लोकांना घाबरलेले असेल. या लोकांसमोर कोरोना हरला. या लोकांचे दुःख च इतके आहे की तो त्यांच्या जवळपास ही येत नाही. आज एक ताई ने रस्त्याच्या कडेला गोंडस बाळाला जन्म दिला. कुठल्या बर गावाचा जन्मदाखला काढावा या बाळाचा? आज रस्त्यावर काही सुसाट गाड्या पळत आहेत,कदाचित त्या गाड्या या चालणाऱ्या लोकांसाठी एकादे यान वाटत असेल आणि त्यात बसलेले ते लोक ऐलियन भुर कन निघून जातात.
कोरोना खरच इतका वाईट आहे का? साधं पाणी मिळू नये प्यायला. कुठं तरी तीन दगडाची चूल आणि त्यात शिजत घातलेला भात. हे लोक पण रोज स्टेटस टाकत असतील का? “आज ची डिश" कदाचित या लोकांना घरी पोहचल्यावर घरचे लोक घरात घेणारही नाहीत पण त्यांना आपल्या घरी जायचे आहे. हा ४५ दिवसाचा कॉरंटईन झालाच आहे अजून घरी गेल्यावर १४ दिवसाचा कॉरंटईन करावा लागणार. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की आपण आता कोरोना सोबत जगायला शिकला पाहिजे. कदाचित या लोकांकडे पाहूनच हा निर्णय घेतला असेल. या लोकांनी त्याच्या सोबत जगण्याचा निर्णय खूप आधीच घेतला होता. सरकारचे एका दिवसात ३ निर्णय येतात ते आम्ही tv पाहणाऱ्या लोकांना समजत नाहीत.काही राज्य आपल्या लोकांना बोलावत आहे तर काही अजूनही संभ्रम अवस्थेत आहे आणि काहींचे तर विचारायलाच नको हे लोक त्यांचे नाहीतच.असो, कोणाला या कोरोना सोबत कसे जगायचं माहीत असेल तर नक्की सांगा.नाहीतर शेवटचा पर्याय आहेच आपण या लोकांनाच विचारू.

Comments
Post a Comment