सकारात्मक भूकंप...!!!
मध्य प्रदेशातील डुंडी हे ईन मीन हजार दीड हजार लोकसंख्येचं छोटंसं गावं, गावच्या वेशीतून गावात प्रवेश केल्यावर मध्यभागी चंडिका माता मंदिर आहे. नेहमी प्रमाणे सकाळच्या वेळी आठ दहा म्हातारे मंदिराच्या परिसरात पारावर बसले होते. गावात चांगले पंधरा वीस पोर पोलीस भरतीची तयारी करत होते. शहराच्या ठिकाणी जाऊन रोज चालू घडामोडी साठी हे पोर वर्तनामनपत्र घेऊन येत असतं. हेच वर्तनामपत्रं मग दिवसभर गावात फिरत असे. या म्हाताऱ्याना वर्तनामपत्रं वाचायची हौस लईच.ज्या लोकांच्या घरी हे वर्तमानपत्र जात नसे तिथे हे म्हातारे पोहचत असत आणि बातम्या देत. अधिक मास महिना संपायला दोन दिवस बाकी होते, नेहमीप्रमाणे गावातल्या शिरप्या च्या पोरं म्हणजे बाळ्यान वर्तमानपत्र आणलं होत बाकीच्या पोरांनी पेपरातून चालू घडामोडीसाठी रंगबेरंगी पेनानी रेघा मारून ठेवल्या होत्या आणि तो पेपर आता म्हाताऱ्याच्या हातात दिला होता. या म्हाताऱ्यांची एक खास बात होती हे आठ दहा म्हातारे प्रत्येक बातमी वाचत असत, रोज कोडं सोडवत असत आणि खास करून सुडोकू सोडवत असत. पण आजचा दिवस जरा वेगळाच होता अप्पासाहेब च्या हातात आज जे पेपरच पान पडलं होत त्यात त...