आणि “तीचा आवाज"
दादा मी आहे मी जिच्यासाठी तुम्ही मेणबत्त्या घेऊन आला आहात. मी काही सांगण्यासाठी आले आहे तेवढं ऐकून घे मग मी जाते निघून. हे बघ दादा मला माहित आहे तुला काळजी वाटत आहे, खूप भीती वाटत आहे, बहिणीची आणि ती वाटायलाच पाहिजे. आहे रे तशी ती खूप धाडसी पण तारीदेखी तू तिला एकदा समजावून सांगा. मला माहित आहे आज दिवसभर तू हाच विचार करत आहेस की तुझी कोणासोबत दुश्मनी तर नाही ना. कधी कोण बदला घेण्यासाठी काय करेल काही सांगू शकत नाही.
दादा मला तू एक सांगशील का रे सुंदर असणं काही गैर आहे? माझा काय रे दोष होता? अचानक होत्याचं नव्हतं झालं बघ. आई ला खूप सांगितलं पण ती काही ऐकत नाही,तोच तोच घटनाक्रम सांगून ती थकली आहे, तिचा आज आवाज निघत नाही जणू. अजून तर कोर्टच्या पायऱ्या चढयाच्या आहेत, अजून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे तिला द्यायची आहेत. मी जरी आज असते ना तरीदेखील हा घटनाक्रम तिलाच सांगावा लागला असता कारण माझी तर जिभच कापली रे मग मी काय बोलणार आणि कशी बोलणार, किती रे क्रूर आहेत हे लोक. तुमचे मन सुन्न होत हे सर्व ऐकताना माझे तर अवयव सुन्न झाले होते. दादा मला सांगशील का रे का होतात हे लोक असे आणि का करत आहेत हे असे क्रूर कृत्य. आज आई सांगत होती माझ्या शरीरावर एक कापड देखील नव्हतं आणि तोंडातून रक्त येत होतं आणि जाता जाता मणका देखील मोडून टाकला. नाही रे आठवतं मला यातलं काहीच, कुठल्या आणि काय अवस्थेत होते मी. खरचं आपण पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो मग हे असं का रे? या बुद्धीहीन प्राण्यांना वेळीच आवर घाला आणि पुरुष जातीला कलंकित होण्यापासून वाचवा. तुम्ही त्यांना राक्षस म्हणू नका करण हे कृत्य राक्षसाला सुद्धा लाजवणारं आहे. यांना कसा रे विचार येत नसेल त्यांचा जन्म देखील एका स्त्रीच्या च पोटी झाला आहे. मला ओढून घेऊन जाताना यांना डोळ्यासमोर त्यांची बहीण,पत्नी, आई का बरं येत नसेल. बाबांना एकाच सांगायचं आहे खचून जाऊ नका मिळेल कदाचीत तुमच्या मुलीला देखील न्याय घाबरून जाऊ नका पण मनात येऊन जातं रे उन्नव सारख काही आपल्या आई-बाबा सोबत झालं तर मग काय उपयोग या न्यायाचा पण करा तुम्ही प्रयत्न.
दादा मला सांगशील का रे ही मुलगी म्हणजे फक्त स्त्री-पुरुष लिंग-गुणोत्तर मोजण्यासाठी च एक एकक आहे का? आई च्या पोटातच असताना मारण्याचा डाव आखता मग कसले रे आकडे मोजता तुम्ही आणि झालाच जन्म तर हे असे मारले जातो. आम्ही कमकुवत नाही,दुबळ्या नाहीत पण व्यवस्थेने(समाजानं) आम्हाला तसं बनवलं आहे. कदाचीत आज काही लोकांसाठी त्या लिंग-गुणोत्तरा मधील प्रत्येक पुरुषांमगील फक्त एक स्त्री चा आकडा कमी झाला असेल,कारण तो कमी झालेला नंबर माझा होता.
आणि जाताना तुला सांगते या जगात खुप विचित्र लोक आहेत कोणासोबत ही वैर करून घेऊ नकोस त्याचा त्रास आपल्या कुटुंबाला होईल. ताई ची काळजी घे असे नाही म्हणणार पण तिला या दुष्ट लोकांपासून वाचण्यासाठी सक्षम बनावं. तिच्या पाठीशी नेहमी उभा राहा.येते, तुझीच एक लहान बहीण.
निःशब्द....😢
ReplyDelete