वेडा की ध्येयवेडा

“वेडा" हा शब्दच मुळी वेडा आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मानव व कदाचित प्रत्येक प्राणी वेडा आहे. पुढे काय? हा या शब्दाचा उगम आहे. हा प्रश्न सजीव जातीला इतका सतावतो की तो वेडा होतो. नक्की हे वेड लागण म्हणजे आहे तरी काय? एकाद्या सजीव,निर्जीव किंवा काल्पनिक गोष्टीच्या मागे हात धुवून मागे धावणं म्हणजे कदाचित वेड लागणे असू शकत किंवा वारंवार मनात येणारे विचार म्हणजे वेड असू शकत. काही लोकांना आपण वेडे बनवतो तर काही स्वतः वेडे होतात. आज या वेडेपणाबद्दल लिहिण्याचं कारण देखील तसं आहे आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे.


आज पृथ्वीवरील सर्वच सजीवांचे मानसिक आरोग्य खालावत आहे. आजपर्यंत ऐकलं आणि पाहिलं होतं मानव तणावाखाली जगात आहे पण काही दिवसांपासून काही प्राण्यामध्ये सुद्धा हा तणाव दिसून येत आहे. हा तणाव निर्माण होण्याच मुख्य कारण म्हणजे मनात येत असलेला एकाच प्रश्न “आता पुढे काय?" खरच इतका महत्त्वाचा प्रश्न आहे का हा?  कधी कधी हे प्रश्नार्थक चिन्ह या तणावाला जबाबदार आहेत.  मी काही दिवसांपूर्वी अश्याच एका अवस्थेतून बाहेर पडलो आहे. एवढंच की कोणाला सांगायची गरज नाही पडली थोडासा सकारात्मक विचार करावा लागला आणि आलो बाहेर. खूप लोक आहेत जे स्वीकारत नाहीत की ते कसल्यातरी तणावाखाली जगात आहेत आणि आपण यांनाच मग वेड लागलं म्हणतो. मला झालेल्या काही वेदना, सर्वात पहिलं “भीती". आपल्या आजूबाजूला सर्व काही सुरळीत चालू आहे, सर्व लोक ठरलेली काम करत आहेत पण आपल्याला भीती वाटते ती का वाटते याच उत्तर लवकर सापडत नाही. जगात सर्व चालू आहे मग आपल्याला कसली भीती हे समजत नाही. मग सुरू होतं घाबरन किंवा थोडा पुढचा प्रकार अंग थरथर कपनं होय आणि याच वेळी आपल्या जेवणावर परिणाम झालेला असतो. थोडासा एकटा बसण्याचा प्रयत्न केला की लागेल अंग थरथरत आणि अंगाला घाम सुटतो. साहजिकच जेवण कमी किंवा नाहीतच जमा म्हणजे शरीरावर परिणाम दिसून येतो. माझ्याबाबतीत जिभेला आरपार आलेला जर (तोंडातल येणे),आत्तापर्यंत जिभेला कधीही जर आला नव्हता एरवी आला तो उठला किंवा गालातल्या आतल्या बाजूला. या नंतर ची भयानक अवस्था म्हणजे झोपेतून अचानक जाग येणे आणि मग हे परत परत भीती,दम लागणे, अंग थरथरने सुरू होत.
आता या वर उपाय विचारात असाल तर एकमेव आहे सर्वात आधी स्वीकार करा आपण कसल्यातरी तणावाखाली जगत आहोत. एकदा हे स्वीकारलं तर काहीच प्रश्न नाही. नंतर सुरू होतो खेळ आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांचा त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते ते आपल्याला कोणत्या पद्धतीची वागणूक देतात? आपल्यासोबत काय बोलतात? कोणते विषय आपल्यासोबत मांडतात? त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीचा चांगला,वाईट परिणाम आपल्यावर होत असतो. ते आपल्याला खरच मस्तीत वेडा म्हणत असतील तर त्याचा देखील खुप मोठा परिमाण आपल्या मनावर झालेला असतो पण त्यावेळी ते आपल्यालाही समजलेलं नसत आपण त्या वेडा या शब्दाकडे दुर्लक्ष करतो.
आता आणखी एक या काळात आपला सारथी असतो तो म्हणजे आपला मोबाईल फोन. कदाचित हा मोबाईल नसतंच तर तणावाखाली जाणाऱ्यांची संख्या कमी असती पण त्याचाच फायदा सुद्धा आहे आपण आपल्या माणसाला बोलून मोकळं होऊ शकतो. आईवडीलांना आपली व्यथा चटकन सांगू शकतो. आपला मुलगा,मुलगी वेडी आहे असं कोणी म्हणलं तरी त्याला किंवा तिला स्वीकारणारे फक्त आईवडील असतात. त्यांची या मध्ये खूप मोलाची भूमिका आहे. आपल्या मुलांना आहे तसे स्वीकारा. हा काही खुप मोठा आजार नाही गरज आहे फक्त त्यांना मायेने,प्रेमाने चार शब्द बोलण्याची बस बाकी काही नको.
मला गरज नाही पडली पण या पुढची पायरी म्हणजे डॉक्टरांचा सल्ला. बिनधास्तपणे डॉक्टरांकडे गेलं पाहिले सल्ले घेतले पाहिजेत आपण या वेडेपणाच्या कुठल्या टप्प्यात आहोत हे तपासलं पाहिजे. आज आस्था,आसरा,साथ, आशा,दिशा अश्या अनेक संस्था या तानावमुक्तीसाठी काम करत आहेत. खूप सारे टोल फ्री नंबर आहेत आपण कधीही फोन करू शकतो.
कदाचित मी या तणावाला फक्त कट मारला असेल पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखा त्यांना काय हवं आहे काय नको ते विचारा आणि हो हा वेडा शब्द फक्त “ध्येयवेड्या"साठीच ठेवा.

Comments

Popular posts from this blog

परत एकदा धोकेबाज मीच..!!!

धोकेबाज मी...!!!