सकारात्मक भूकंप...!!!
मध्य प्रदेशातील डुंडी हे ईन मीन हजार दीड हजार लोकसंख्येचं छोटंसं गावं, गावच्या वेशीतून गावात प्रवेश केल्यावर मध्यभागी चंडिका माता मंदिर आहे. नेहमी प्रमाणे सकाळच्या वेळी आठ दहा म्हातारे मंदिराच्या परिसरात पारावर बसले होते. गावात चांगले पंधरा वीस पोर पोलीस भरतीची तयारी करत होते. शहराच्या ठिकाणी जाऊन रोज चालू घडामोडी साठी हे पोर वर्तनामनपत्र घेऊन येत असतं. हेच वर्तनामपत्रं मग दिवसभर गावात फिरत असे. या म्हाताऱ्याना वर्तनामपत्रं वाचायची हौस लईच.ज्या लोकांच्या घरी हे वर्तमानपत्र जात नसे तिथे हे म्हातारे पोहचत असत आणि बातम्या देत. अधिक मास महिना संपायला दोन दिवस बाकी होते, नेहमीप्रमाणे गावातल्या शिरप्या च्या पोरं म्हणजे बाळ्यान वर्तमानपत्र आणलं होत बाकीच्या पोरांनी पेपरातून चालू घडामोडीसाठी रंगबेरंगी पेनानी रेघा मारून ठेवल्या होत्या आणि तो पेपर आता म्हाताऱ्याच्या हातात दिला होता. या म्हाताऱ्यांची एक खास बात होती हे आठ दहा म्हातारे प्रत्येक बातमी वाचत असत, रोज कोडं सोडवत असत आणि खास करून सुडोकू सोडवत असत. पण आजचा दिवस जरा वेगळाच होता अप्पासाहेब च्या हातात आज जे पेपरच पान पडलं होत त्यात त्यात त्यांच्या गावाचं नाव होत. एकदम कोपऱ्याला छोट्या बातमीत डुंडी हे नाव अप्पासाहेबाला ठळक दिसत होत. बातमी वाचण्याच्या आधीच आनंदित होऊन त्याने सर्वांना सांगितलं आपल्या गावाचं नाव पेपरात आलं आहे. सगळे म्हातारे मग बाकीच्या बातम्या वाचायच्या सोडून अप्पासाहेबाकडं पाहू लागले आणि बातमी वाचण्याचा इशारा केला. तसे अप्पासाहेब बातमी वाचू लागले आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला. बातमी होती येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची. भूकंप होणार होता अशी काहीशी बातमी छापून अली होती. सकाळची वेळ होती आणि नेहमीप्रमाणे लोक आपापल्या शेतात कामाला निघाले होते. आता म्हाताऱ्यानी बाकीच्या बातम्या वाचायच्या सोडून घर गाठले. काहींचा तर घास कोरडा पडला आणि कसे बसे घरी गेले. अप्पासाहेबाच्या दारातच त्यांचा नातू बसला होता चटकन बातमी सांगितली डुंडी गावात भूकंप होणार आहे आणि गाव जमिनीत गडप होणार आहे, अप्पासाहेबांच्या नातू तसा कारामतीच होता. तो आप्पाची मजा घेऊ लागला पण थोड्या वेळानी अप्पानी तो पेपरचा तुकडा त्याच्या समोर धरला आणि अप्पाचा नातू सरळ शेतात पळत सुटला अशीच काहीशी परिस्थिती अर्ध्या गावाची झाली होती. इकडे पोलीस भरतीची तयारी करणारे पोर पार येडी झाली होती विचार करत होते आपल्या गावची बातमी पेपर मध्ये आली आणि आपल्याला कसं काय माहित नाही? बाळ्यानी आणलेला पेपर आता मिळणं शक्य नव्हतं म्हणून हि पोर आणि गावातली काही लोक शहराकडे धाव घेऊ लागले मिळेल त्या वाहनाने ते शहरात पोहचू लागले आणि पेपर स्टॉल वरून पेपर खरेदी करू लागले. रोज दहा पंधरा पेपर शिल्लक राहत असत पण आज दुपारच्या वेळीच सर्व पेपर संपले होते म्हणून दुकानदार खुश होता. मात्र गावच्याकाही लोकांना अजूनही पेपर मिळाला नव्हता त्यात दुपारच जेवण न करता आलेला गणपत संध्याकाळच्या वेळेला एका भज्यांच्या हॉटेलात गेला पोटभर भजे खाल्ले आणि कागद फेकून देणार तेवढ्यात डुंडी नाव त्याला दिसलं आणि खुश होऊन उड्या मारत त्याने गावचा रस्ता धरला. जसं बाकीच्या लोकांना कळलं कि भज्यावाल्याकडं त्यो पेपर मिळत आहे तसे लोक त्याच्या हॉटेलसमोर गर्दी करू लागले. मग भज्यावाल्यानी पण शक्कल लढवली भजे खा आणि पेपर घेऊन जा त्या दिवशी भजेवाला जाम खुश होता. डुंडी वाला पेपर तर गणपत केंव्हाच घेऊन गेला होता आता बाकीचे लोक फक्त भजे खात होते आणि पोटातल्या ओरडणाऱ्या कावळ्यांना शांत करत होते. आता बराच अंधार पडत आला होता म्हणून लोक गावचा रस्ता धरू लागले जसे आले तसे परत फिरू लागले. गावात कोणाच्याही घरी चूल पेटली नव्हती लहान लेकरांचा रडण्याचा आवाज येत होता.
गावच्या सरपंचाला आणि पाटलाला हि बातमी कोणीतरी कानावर घातली होती तसे ते देखील तो पेपर मिळवण्यासाठी धडपड करत होते पण नाहीच मिळाला आणि रात्री आठ च्या दरम्यान सर्व गावकऱ्यांनी चंडिकामाता मंदिरासमोर जमा व्हायचा आदेश दिला. भजे जाणारा गणपत पण आला होता त्याच्या हातात तो पेपर पाहून सरपंचानी डोळ्याच्या इशाऱ्यानेच गणपत ला खुणावलं दे तो पेपर इकडे नाईलाजास्तव त्याला तो पेपर चा तुकडा सरपंचाकडे द्यावा लागला. पाटलांची व्यथा देखील अशीच काहीशी होती पण कोणीतरी पळत आलं आणि पाटलांच्या हातात तो पेपर दिला. सगळीकडे शांतता पसरली होतो. बहुतेक फक्त जेष्ठ लोकच आली होती बाकीचे लोक अजूनही येत होते.
पाटील आणि सरपंच यांची
खूप खुन्नस होती. पाटलांचा श्रीकांत आणि सरपंचांचा विजय सोबतचे. पाचवी-सहावी पर्यंत
खास दोस्ती होती पण या राजकारणामुळे त्यांच्या दोस्तीची पार वाट लागली होती एवढी घट्ट
मैत्री असेलेले आज एकमेकांचे तोंड पाहत नव्हते कारण पुढे येणाऱ्या निवडणुकीत ते एकमेकांचे
विरोधक होते. पण या आजच्या बातमीने सर्वाना एकत्र आणले होते. श्रीकांत सरपंचाच्या बाजूला
तर विजय पाटलांच्या बाजूला बसला होता. गावाचे बहुतेक मंडळी आता जमा झाली होती. नेहमी
तास तास बोलणारे सरपंच येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती वर दोन चार शब्द बोलून खाली बसले.
बोलणार तरी काय ? हा प्रश्न होताच पाटलांची देखील हीच अवस्था होती. यावर आता तोडगा
निघत नव्हता रात्रीचे दहाएक वाजले असतील गावाचे सर्व लोक शांतपणे घराकडे वळाले. बहुतेकांच्या
घरात आता स्वयंपाक तयार होता आणि घरच्या बायका नेमका निर्णय काय झाला हे ऐकण्यासाठी
तयार होत्या. या भूकंपाचा निर्णय तर काहीच झाला नव्हता. दोन घास खाऊन पुरुष मंडळी अंथरुणाकडे
वळाले पण घरातील बायकांनी मात्र अजून जेवण केलं नव्हत त्यांना देखील आता काळजी वाटू
लागली. काहीजणी तर न जेवताच धन्याशेजारी जाऊन कुजबुज करू लागल्या. काही लोक विचार करू
लागले जावं का गाव सोडून? उचलावा का सर्व संसाराचा गाडा आणि जावं शहरात. शिरपा अन्नाच्या
घरात तर निघण्याची तयारी देखील झालेली पण शिरपाच म्हातार-म्हातारी मात्र हलायला तयार
नव्हते त्यानी सरळ सांगून टाकलं तुला जायचं असलं तर तू जा आम्ही नाही येणार मग शिरपाणी
पण निर्णय घेतला नको जायला.
गावातल्या काही टवाळखोर
पोरांना एक कल्पना सुचली पुढल्या दोन तीन दिवसात भूकंप येणार आहे तर आत्ताच मज्जा करून
घ्या, आपापल्या राहिलेल्या मनोकामना पूर्ण करून टाका. कोणाला काही खरेदी करायची असेल
तर करून घ्या आणि अश्याच खुपसाऱ्या कल्पना सुचू लागल्या. रात्रीत हि खबर देखील गावात
पोहचली परत पोर जमा जाऊ लागली, मोठी मानस चर्चा करू लागले, बायका एकमेकींच्या घरी जमू
लागल्या. जो पर्यंत आहेत तो पर्यंत बिनदास्त जागून घ्या असे वाक्य कानी पडू लागले.
आता लोक सकाळ होण्याची
वाट देखील पाहायला तयार नव्हते रात्रीतच दिवे लागले सगळीकडे झगमग, चमचमीत प्रकाश पडला.
घरच्या बायका गोडधोड करायच्या तयारीला लागल्या. पहाटेपर्यंत लोकांचा दिवाळीचा स्वयंपाक
तयार झाला. सकाळी एक खास गोष्ट घडली सरपंचाचा पोरगा आणि पाटलांचा पोरगा एकमेकांसमोर
आले. नेहमी एकमेकांवर तुंबलेले आज मात्र एकमेकांना आलिंगन देत होते सगळीकडे आनंदीआनंद
होता. यात फायदा प्रेमी युगुलांचा झाला त्यांना कोणीही आडवत नव्हत मग गावातली सगळी
लफडे समोर येवू लागली. शेजारची चिंगी त्या बाळ्यासोबत मस्त गप्पा मारत होती आई ने दोन
चार वेळा आवाज दिला पण तिने काही ऐकलं नाही. शाळेपासूनच विवेक पूजावर मनापासून प्रेम
करत होता पण कधी बोलू शकला नव्हता पण आज त्यानेदेखील हिम्मत केली आणि बोलून टाकलं.
खरी मज्जा तर तेंव्हा आली पाटलांच्या पोरीला सरपंचाचा विजय आवडत होता हि गोष्ट तिने
पाटलांना सांगितली. पाटलांना वाटत असलं हिची बुद्धी काय शेण खायला गेली आहे काय पण
पाटील थेट सरपंचाच्या दारात गेला. आता श्रीकांत हा विजयाचा मेव्हणा झाल्यात जमा होता
त्यांनी लग्नाची तयारी सुरु केली. लहान पोर जाम खुश होती कारण शाळेला आता तीन दिवस
सुट्टी होती. शहराच्या ठिकाणी जाऊन लोक मिठाई घेऊन येत होते आणि गावात वाटत होते. गावातले
सर्व लोक एकमेकांच्या घरी जात होते. त्यात अजून एक चांगली गोष्ट हि घडली कि किसनअप्पा
आणि धोंडोपंता च भांडण पार कोर्टात गेलेलं पण आज ते एकाच ताटात जेवण करताना पाहिलं.
दोन दिवस असेच सर्वांचे
मजेत गेले आणि कदमची म्हातारी आज सकाळी गेल्याची बातमी गावभर पसरली पण कोणीही रडत नव्हतं
सगळे बोलत होते उद्या जायची ती आज गेली एवढंच आणि तिच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उरकला.
बातमी आता थोडी वरपर्यंत
पोहचली होती गावात अधिकारी लोक येऊ लागले शाळा का बंद आहे त्याची तपासणी करण्यासाठी
शाळेचे अधिकारी येऊ लागले. आलेल्या अधिकाऱ्यांचे देखील स्वागत होऊ लागलं त्यांना पंचपक्वानच
जेवण लोक करत होते. म्हातारे लोक तर अगदीच खुश होते.
तिसरा दिवस उजाडला
आणि गावाची बातमी वर्तमानपत्रात देण्यापर्यंत पोहचली. गावात बऱ्याच वर्तमानपत्राचे
पत्रकार येऊ लागले आणि त्यात दुपारनंतर आला भज्या वाला वर्तमानपत्राचा पत्रकार. हे
सर्व पाहून त्याचे डोळे फिरले आणि घाबरला देखील कारण ती बातमी त्यानेच दिली होती. स्वतःला
सावरत असताना अचानक त्याच्या कानावर पडलं कि पाटलांच्या पोरीचं लग्न आज सरपंचाच्या
पोरासोबत आहे. आता सर्व पत्रकारांनी बातमी घेऊन परत गेले होते पण हा पत्रकार मात्र
तिथेच होता. पाटील त्याच्याकडे आला आणि विचारू लागला काय पाव्हणं बातमी अजून मिळाली
नाही वाटत? पत्रकार म्हणाला पाटील तेवढ तुमच्या पोरीचं लग्न झालं कि झालीच ना बातमी
ती पण देऊन टाकतो उद्याच्या पेपर मध्ये आणि पाटील खुश झाले. पाटलांच्या पोरीचं आणि विजय च लग्न थाटामाटात
पार पडलं.
गावाचे लोक आता फक्त
उद्या येणाऱ्या पेपरातल्या बातमीची वाट पाहत होते. जवाजवळ सर्वच वर्तमानपत्र गावात
आले सर्वांनी बातम्या वाचल्या खुश झाले आणि ठरल्या प्रमाणे रात्रीत भूकंप होऊन गाव
गडप होणार हे सर्वाना माहित होत. अप्पासाहेब आता सर्वाना माहीतच आहेत कान्याकोपऱ्यातल्या
बातम्या वाचणारे भज्या वाल्या वर्तमानपत्रात पत्रकारानी दिलगिरी व्यक्त केलेली बातमी
अप्पासाहेबांनी वाचली. बातमीत लिहिलं होत डुंडी हे गाव भारतातील नसून ते मन्रो, संयुक्त
राष्ट्रातील आहे. थेतील भूगर्भशास्त्रज्ञा च्या मते काही दिवसात तिकडे भूकंप होऊ शकतो.
धन्यवाद... !!!


Khupach mast lihlay.....shevat paryant pudhe kay hoil asa vatat raht....👍👍
ReplyDeleteधन्यवाद मित्रा
DeleteThanks Bani Bhai...
ReplyDeleteBhari 🤘🏻
ReplyDeleteTHANK YOU...
Deleteवाह ...भारी लिहिलंय
ReplyDeleteKhatarnak Short lekhak
ReplyDelete