जगा आणि जगू द्या हवं तसं...!!!
आत्महत्या हा आत्महत्या करणाऱ्याचा अयशस्वी पण चुकून यशस्वी झालेला प्रयत्न असतो. जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी आपण मारून जावं असं नक्की वाटलेलं असतं मग आपण मरतो का लगेच तर नाही. आईचा मार खाल्ला, शिक्षकांनी सर्वांसमोर झापलं, परीक्षेत अपयश आलं असे अनेक कारणं आहेत मरण्यासाठी. एकाद्या व्यक्तीचा राग आला तर “मर तिकडं जाऊन" हे निघालेले शब्द खूप मनावर आपण घेत नाही पण काही घटना माणसाला निःशब्द करतात. मानव पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. पण तो खरचं आहे का? आपण आपल्या माणसाला जपत नाही असच आजच्या काळात दिसत आहे. काही घटना घडतात तेंव्हा वाटत कदाचीत ती वेळ चुकवता देखील आली असती. खूप लोक नैराश्यात जात आहेत, तेवढेच त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न पण करत आहेत. ह्या प्रयत्नांना गरज आहे कुटुंबातील व्यक्तीची. नैराश्यात गेलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. ती व्यक्ती वेडा आहे असं कधीही भासवू नका, कारण त्याच पुढील पाऊलं काय असू शकते हे मागील काही काळात आपण पाहिलं आहे. नैराश्य येण्याची खूप कारणं असू शकतात, आपलं पुढे काय होईल? एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे ...