Posts

Showing posts from 2020

ऑनलाइन शिक्षणाच्या आईचा घो...!!!

Image
आपण चुकतोय, खूप मोठं संकट ओढवून घेत आहोत याची जरादेखील कल्पना आपल्याला नाही. लेकरांच्या बापानो आणि आयानो कदाचित वेळ हातात असेल, “कदाचित". एक वाईट व्यसन तुमच्या लेकरांना लागलेलं आहे. आपले दिवस आठवा, आपल्या हातात तो मोबाईल आपल्या वयाच्या कितव्या वर्षी आला ते आठवा. काळ बदलत नसतो आपण बदलत असतो. आजच जग खूप फास्ट झालं आहे आपण म्हणतो पण जग त्याच्या वेळेनुसार चालू आहे फक्त मानव त्या वेळेच्याही पुढे धावत आहे. कदाचित आज मानवच मरण्याच वय ६०-६५ वर येण्याचं कारणही हेच असेल. आपण जर या काळासोबत जगलो तर नक्कीच जास्त वर्ष जगू. काळाच्या पुढे जाणून आपण आपलं आयुष्य कमी करत आहोत. आता मूळ मुद्धा मोबाईल चा, हे व्यसन झालं आहे. खूप बारीक विचार करायला हवा. आपण आनंदात जगलो, खेळलो, बागडलो. आज परिस्थितीत तशी नाही.  मला मी १२वी ला असताना फक्त फोन मिळाला होता स्मार्टफोन नाही. आज फक्त एक कारण आहे कोरोनाच म्हणून काय सरसकट तुम्ही लेकरांना मोबाईल घेऊन देणार आहेत का? यावर काही दुसरा पर्याय का नाही शोधत? आपण या लेकरांना कुठे घेऊन चाललो आहोत याचा जारदेखील विचार करत नाही. हे लिखाण मी कोरोना येण्याच्या खूप आ...

रानगठा विरुद्ध रानगवा

Image
रानगठे आहेत राव तुम्ही. मला रानगवा म्हणता पण तुम्ही खरे रानातले. माझी जरा चूकच झाली, प्राणाला मुकलो मी आज. डिप्रेशन, एंझायटी, पॅनिक, प्रेशर हे सर्व तुम्हाला जस येत तसचं आम्हाला देखील येत. माणूस हा देखील एक प्राणी आहे हे तो विसरत आहे. आम्ही त्यांच्यावर हल्ले करतो असं सारखं बोंबलत असतो. लहान असताना आई रागावल्यावर मी दूर निघून जाणार असं नेहमी म्हणत होतो. आज तेच झालं. एकदा आईला विचारलं की आपण का नाही जाऊ शकत शहरात ते लोक सुद्धा एक प्राणीच आहेत जसे आपण आहोत. आई त्या वेळी जास्त काही बोलली नाही पण आज समजलं ती काहीच का बोलली नव्हती. मला नेहमी एक प्रश्न पडायचा या पृथ्वीवर सर्व जीव एक प्राणी म्हणूनच जन्माला येतात मग असे वेगवेगळे का राहत असतील? आम्ही माणसापासून दूर गेलोय की माणसांनी आम्हाला दूर केलाय काही समजत नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्या मध्ये जशी दरी निर्माण झाली आहे तशीच तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. बरं मी जसं जसं मोठा होत होतो तसं तसं शहराकडे जाण्याची इच्छा वाढत होती. चार पाच दिवसापूर्वी आम्ही सर्वच जंगलात भटकत होतो, मस्ती करत होतो, नंतर जाम थकलो म्हणून जरा विश्रांती क...

जगा आणि जगू द्या हवं तसं...!!!

Image
आत्महत्या हा आत्महत्या करणाऱ्याचा अयशस्वी पण चुकून यशस्वी झालेला प्रयत्न असतो. जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी आपण मारून जावं असं नक्की वाटलेलं असतं मग आपण मरतो का लगेच तर नाही. आईचा मार खाल्ला, शिक्षकांनी सर्वांसमोर झापलं, परीक्षेत अपयश आलं असे अनेक कारणं आहेत मरण्यासाठी. एकाद्या व्यक्तीचा राग आला तर “मर तिकडं जाऊन" हे निघालेले शब्द खूप मनावर आपण घेत नाही पण काही घटना माणसाला निःशब्द करतात. मानव पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. पण तो खरचं आहे का? आपण आपल्या माणसाला जपत नाही असच आजच्या काळात दिसत आहे. काही घटना घडतात तेंव्हा वाटत कदाचीत ती वेळ चुकवता देखील आली असती. खूप लोक नैराश्यात जात आहेत, तेवढेच त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न पण करत आहेत. ह्या प्रयत्नांना गरज आहे कुटुंबातील व्यक्तीची. नैराश्यात गेलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. ती व्यक्ती वेडा आहे असं कधीही भासवू नका, कारण त्याच पुढील पाऊलं काय असू शकते हे मागील काही काळात आपण पाहिलं आहे. नैराश्य येण्याची खूप कारणं असू शकतात, आपलं पुढे काय होईल? एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे ...

पुढे शाळा आहे...!!!

Image
“सावधान" पुढे शाळा आहे वाहने सावकाश चालावा. विसरलात वाटत हे वाक्य, काय सुसाट गाड्या पळवत आहात तुम्ही. सर्वप्रथम तर माफी मागते या परिस्थितीला मी सुद्धा तितकीच जबाबदार आहे. आज वाटतं, नको तितकं शिकवलं आणि आज ही परिस्थिती आली. बेट्या तुला काय मी हा व्हारस तयार करायला एवढं शिकवलं होत का रे? आज तू चक्क माझंच दार बंद केलंस.  माझे लेकरं येत नाहीत माझ्याकडं, ते गुरुजी सुद्धा कधीतरीच चक्कर मारतात. दोन आठवड्यापूर्वी गुरुजी आले आणि एकदा दार उघडलं तर जरा कुठं मोकळा श्वास घेतला. त्यादिवशी गुरुजी जरा चिंतेत वाटत होते. म्हणून विचारावं म्हटलं नेमकं काय झालं? तर त्यांचे डोळे भरून आले. गुरुजींच्या खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्यासोबत मग त्या परत जाग्या करू लागले. गुरुजींचं हे शेवटचं वर्ष होत, ते सेवानिवृत्त होणार होते. पण त्यांना अशी सेवानिवृत्ती नको होती. सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमला एकाद्या लहानग्यांच्या हाताने फुलं घेऊन निवृत्ती हवी होती. त्यांना त्या बाहेरच्या फळ्यावर “सेवानिवृत्ती समारंभ" हे शब्द हवे होते ते त्यांना सोनेरी अक्षरात लिहून ठेवायचे होते. काहीच दिवसात आता गुरुजी शाळेत ...

बजावो रे...!!!

Image
आज टिकली जरा नाराज दिसत होती तेवढ्यात तिथं सुरसुरी आली आणि विचारलं का गं बया काय म्हणून एवढी नाराज हायीस ? टिकली आपलं बराच वेळ काही नाही काही नाही म्हणून बोलत होती पण सुरसुरी आता खोलात गेली तेंव्हा कळलं टिकली नाराज असण्याचं कारण "बाई तुमचं बरं हाई तुमची आठवण होती तरी वर्षभरातून दोन चार बऱ्या नाहीतर आम्ही हि दिवाळी कि डायरेक्ट पुढची दिवाळी म्हणून मी जरा नाराज हाई बघ" हे दोघीच संभाषण सुरु होत तेवढ्यात तिथं गण्या आला आणि एक मोठा सुतळी बॉम्ब वाजवून गेला अक्षरशः दोघीही बहिऱ्या झाल्या. अचानक झालेल्या आवाजाने छातीत धडधड वाढली होती आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं आणि ऐकू देखील येत नव्हतं. जवळपास दहा मिनिटानंतर सुरसुरीला तरी अंधुक दिसायला लागलं पण टिकली ला मात्र अजूनही काही सुचत नव्हतं कस बस टिकलीला सुरसूरीने हलवून शुद्दीवर आणलं. तेंव्हा टिकली बोलू लागली बघ बाई हे असलं आपलं जिणं काय अर्थ हाय का याला ? गण्या अजून एक सुतळी बॉम्ब घेऊन आला इकडे यांच्या अंगाचा नुसता थरकाप सुटला. आत्ता तर कुठं जरा बरं वाटायला लागलं होत तेवढ्यात हो बाबा अजून एक बॉम्ब घेऊन आला. गाण्याचा बाप दारात येऊन...

धोकेबाज मी...!!!

Image
झक मारली आणि चाकाचा शोध लागला. इथं आमचा विचार करतच नाही राव तुम्ही. नुस्ती वंगवता वढ एक्सलरेटर आणि पळव ऐशी च्या स्पीड नी. पार आता जीव गेला की राव माझा. नुसता खुळखुळा करून टाकला आहे. टाकतेत तीस च आणि पाळवतेत पन्नास च्या तेला इतकी. त्यो मेकॅनिकल इंजिनीअर सुद्धा डोक्याला हात लावून बसला असेल गडे. अरे नुसतं तेल टाकून काही होत नसतंय, कधी तरी सर्व्हिसिंग नावाची गोष्ट असतीय ती पण करत जावा. आणि माझं वजन किती तुमचं तीन-चार लोकांचं किती जरा तरी विचार करा की लका. स्पीड चा काटा मोडून जाईल एकाद्या दिवशी, त्यो काही सत्तर च्या खाली येत नाही गडे.  आता मी म्हातारी झाली आहे,आता लवकरच माझी काळजी नाही घेतली तर काही खरं नाही बघ. प्रेम नाही राव राहील आपलं पाहिल्या सारखं. रोज मला पुसून काढायचास आठवड्यात एकदा धुवून काढायचायस नाहीतर अत्ता पार वाट लावली आहेस. दोन चकवरच्या गाडीवर तुम्ही चार लोक बसता जरा तरी काही वाटूद्या, म्हणजे मी असं नाही म्हणत सहा चाकाच्या बस मध्ये फक्त सहाच लोकांनी बसलं पाहिजे पण पहा विचार करून. थकले बाबा मी आता खरच एकाद्या दिवशी कुठे तरी अचानक माझा प्राण नक्की जाणार आणि त्या ...

सकारात्मक भूकंप...!!!

Image
  मध्य प्रदेशातील डुंडी हे ईन मीन हजार दीड हजार लोकसंख्येचं छोटंसं गावं, गावच्या वेशीतून गावात प्रवेश केल्यावर मध्यभागी चंडिका माता मंदिर आहे. नेहमी प्रमाणे सकाळच्या वेळी आठ दहा म्हातारे मंदिराच्या परिसरात पारावर बसले होते. गावात चांगले पंधरा वीस पोर पोलीस भरतीची तयारी करत होते. शहराच्या ठिकाणी जाऊन रोज चालू घडामोडी साठी हे पोर वर्तनामनपत्र घेऊन येत असतं. हेच वर्तनामपत्रं मग दिवसभर गावात फिरत असे. या म्हाताऱ्याना वर्तनामपत्रं वाचायची हौस लईच.ज्या लोकांच्या घरी हे वर्तमानपत्र जात नसे तिथे हे म्हातारे पोहचत असत आणि बातम्या देत. अधिक मास महिना संपायला दोन दिवस बाकी होते, नेहमीप्रमाणे गावातल्या शिरप्या च्या पोरं म्हणजे बाळ्यान वर्तमानपत्र आणलं होत बाकीच्या पोरांनी पेपरातून चालू घडामोडीसाठी रंगबेरंगी पेनानी रेघा मारून ठेवल्या होत्या आणि तो पेपर आता म्हाताऱ्याच्या हातात दिला होता. या म्हाताऱ्यांची एक खास बात होती हे आठ दहा म्हातारे प्रत्येक बातमी वाचत असत, रोज कोडं सोडवत असत आणि खास करून सुडोकू सोडवत असत. पण आजचा दिवस जरा वेगळाच होता अप्पासाहेब च्या हातात आज जे पेपरच पान पडलं होत त्यात त...

वेडा की ध्येयवेडा

Image
“वेडा" हा शब्दच मुळी वेडा आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मानव व कदाचित प्रत्येक प्राणी वेडा आहे. पुढे काय? हा या शब्दाचा उगम आहे. हा प्रश्न सजीव जातीला इतका सतावतो की तो वेडा होतो. नक्की हे वेड लागण म्हणजे आहे तरी काय? एकाद्या सजीव,निर्जीव किंवा काल्पनिक गोष्टीच्या मागे हात धुवून मागे धावणं म्हणजे कदाचित वेड लागणे असू शकत किंवा वारंवार मनात येणारे विचार म्हणजे वेड असू शकत. काही लोकांना आपण वेडे बनवतो तर काही स्वतः वेडे होतात. आज या वेडेपणाबद्दल लिहिण्याचं कारण देखील तसं आहे आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे. आज पृथ्वीवरील सर्वच सजीवांचे मानसिक आरोग्य खालावत आहे. आजपर्यंत ऐकलं आणि पाहिलं होतं मानव तणावाखाली जगात आहे पण काही दिवसांपासून काही प्राण्यामध्ये सुद्धा हा तणाव दिसून येत आहे. हा तणाव निर्माण होण्याच मुख्य कारण म्हणजे मनात येत असलेला एकाच प्रश्न “आता पुढे काय?" खरच इतका महत्त्वाचा प्रश्न आहे का हा?  कधी कधी हे प्रश्नार्थक चिन्ह या तणावाला जबाबदार आहेत.  मी काही दिवसांपूर्वी अश्याच एका अवस्थेतून बाहेर पडलो आहे. एवढंच की कोणाला सांगायची गरज नाही पडली थोडासा सकारात्म...

आणि “तीचा आवाज"

Image
दादा मी आहे मी जिच्यासाठी तुम्ही मेणबत्त्या घेऊन आला आहात. मी काही सांगण्यासाठी आले आहे तेवढं ऐकून घे मग मी जाते निघून. हे बघ दादा मला माहित आहे तुला काळजी वाटत आहे, खूप भीती वाटत आहे, बहिणीची आणि ती वाटायलाच पाहिजे. आहे रे तशी ती खूप धाडसी पण तारीदेखी तू तिला एकदा समजावून सांगा. मला माहित आहे आज दिवसभर तू हाच विचार करत आहेस की तुझी कोणासोबत दुश्मनी तर नाही ना. कधी कोण बदला घेण्यासाठी काय करेल काही सांगू शकत नाही.  दादा मला तू एक सांगशील का रे सुंदर असणं काही गैर आहे? माझा काय रे दोष होता? अचानक होत्याचं नव्हतं झालं बघ. आई ला खूप सांगितलं पण ती काही ऐकत नाही,तोच तोच घटनाक्रम सांगून ती थकली आहे, तिचा आज आवाज निघत नाही जणू. अजून तर कोर्टच्या पायऱ्या चढयाच्या आहेत, अजून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे तिला द्यायची आहेत. मी जरी आज असते ना तरीदेखील हा घटनाक्रम तिलाच सांगावा लागला असता कारण माझी तर जिभच कापली रे मग मी काय बोलणार आणि कशी बोलणार, किती रे क्रूर आहेत हे लोक. तुमचे मन सुन्न होत हे सर्व ऐकताना माझे तर अवयव सुन्न झाले होते. दादा मला सांगशील का रे का होतात हे लोक असे आण...

परीक्षा तुम्ही आणि परत परीक्षा

Image
प्रत्येक वेळी मलाच टोचून बोलता राव तुम्ही. निर्णय घ्यायचे कोणीतरी आणि शिव्या खायच्या आम्ही हे काही बरोबर नाही. आई ज्याप्रमाणे सर्व लेकरांसाठी समान असते तशीच मी पण आहे. मला पण समजतंय रे सर्व तुम्ही लाखो लोक माझ्यावर प्रेम करता आणि हे अजून वाढतंच चाललं आहे. आता मला याचा खूप ताण पडत आहे. होय मी MPSC आहे, मागच्या काही दिवसात तुमची झालेली मनस्थिती मला चांगली माहीत आहे. खूप सारी पोरं भयंकर तणावात जगत आहेत. काहींचा अभ्यास होत नाही तर काही आता तो करतच नाहीत.  आज अचानक माझ्यावर प्रेम करणारा नामु (नामदेव) मला भेटला, खूप रडला माझ्याजवळ आता कदाचीत ही शेवटची भेट असणार अस बोलत होता. मागच्या ३ वर्षांपासून माझ्यावर खूप प्रेम करणारा आज असा अचानक का बोलत असेल बरं. खूप अभ्यासू होता तो, मागच्या वेळी जवळपास अधिकारी फिक्स होता. त्यावेळी सुद्धा असाच रडून मोकळा झाला होता तो, मी तरी काय करणार ना waiting list नावाचा प्रकार पाहिजे असं मला पण वाटत, तो माझा हक्क काही लोकांमुळे मला मिळाला नाही. मला असे तुम्ही उदास होऊन बसलेले अजिबात पाहवत नाही. नाम्या मला बोलला होता पुढच्या वर्षी आपलं फिक्स बरं का...! मी पण मनो...

आकड्यांचा खेळ "मटका"

Image
IPL आली रे आली अरे पण इथे तर पहिलेच खेळ सुरु झाला आहे. असल्या कोरोनाच्या काळात IPL होणार आहेत तरी ठीक आहे. तसेही लोकांचे हाल होत आहेत दलाल, मध्यस्थी, ब्रोकर आणि सट्टेबाज यांचे पार वाटोळं केलं आहे ह्या कोरोनाने अरे जरा थांबा थांबा असा काही विचार करू नका असा काही झालं नाही. आज पर्यंत आपण सट्टेबाजी कुठपर्यंत ऐकली आहे तर एकादी क्रिकेट ची मॅच किंवा फुटबॉल आणि अजून असेच काही खेळ पण या कोरोनामुळे हे सर्व खेळ सध्या तरी बंद आहेत मग काय करणार हे सट्टेबाज लोक उपाशी राहायला लागले ना राव हे या वर त्यांनी मस्त प्लॅन शोधून काढला "कोरोनावर सट्टेबाजी". आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन हो त्यांनी आता कोरोनावर पण सट्टेबाजी सुरु केली आहे. भरमसाठ पैसे काढत आहेत हे लोक. आकड्यांचा खेळ म्हणलं कि आपल्याला आठवत IPL किंवा रोज खेळल्या जाणाऱ्या लॉटरी. यात सर्व आकडे असतात ना कुठलं अक्षर ना कुठलं वाक्य त्याच खेळात आता अजून एक नवा खेळ आला आहे कोरोना नावाचा ह्यात पण नुसते आकडे असतात. आणि या आकड्यावर आज जुगार खेळला जात आहे. रोज नवे आकडे येत आहेत तसा यांचा धंदा जोरात होत आहे. हे सर्व आपल्या विचार करण्...

असला शेवट नको

Image
हे असलं काही पाहावं लागलं असं वाटलं नव्हतं. खुप वाईट आहेस तू. तुला मारण्यासाठी पूर्ण जग मागे लागलं आहे,तरी तू त्यांच्या कचाट्यातुन सुटत आहेस पण नाही हार मानणार तुझा शेवट आता जवळ आला आहे. काही लोकांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या तर काहींच्या खूपच दुःखद. बऱ्याच लोकांना रोजच्या कामातून थोडा आराम दिलास,पण तो सुद्धा जरा जास्तच झाला. हे सर्व झालं चांगल्या गोष्टी बद्दल पण आज परत तोच प्रसंग डोळ्यासमोर आला “रश्मी पुराणिक ABP माझा च्या पत्रकार” असाच काहीस घडलं मित्राच्या मेस वाल्या काकूंसोबत. आज त्या घरातील कर्ता पुरुष नाही. सर्वात पहिले काकांना कोरोना झाला.काकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु नंतर समजलं काकांना कोरोना झाला आहे. तो पर्यंत काकू आणि त्यांची मुलगी त्यांना भेटायला जात होत्या साहजिकच काकांना कोरोना झाला म्हणजे या दोघीच्या पण टेस्ट कराव्या लागणार आणि शेवटी जे नको व्हायला तेच झालं काकू आणि मुलगीला पण कोरोना झाला. मग काका वेगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि काकू आणि मुलगी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सुरवातीला तसा काही त्रास नव्हता पण काकांची तब्बेत नंतर नंतर जरा जास्तच खर...

*फोटो*

Image
काय राव विसरला वाटतं आम्हाला, असं कुठं असतंय व्हय. आम्ही नाही बाबा विसरलो कुणालाही,आणि विसरणार तरी कसे ना आम्ही म्हणजे आठवण असतो बाबा सर्वांची.अन तीच जर पुसली तर मग कस होणार ना म्हणून आम्हाला सर्व आठवत आणि विसरूनही चालत नाही. कसले भारी दिवस होते ना आमचे पण मस्त पैकी मोठ्या कॅमेरा मध्ये रीळ म्हणून बसायची मज्जा काही औरच होती. मग त्या रीळ ला निगेटिव्ह म्हणायचे आणि ह्या निगेटिव्ह मधून आम्ही बाहेर पडायचो. मात्र आता या मोबाईल मध्ये आम्हाला बंद करून ठेवल आहे. कधी कधी त्या मोबाईल मध्ये इतका दम कोंडतो ना असा वाटत मारतोय की काय, त्यांनी दिले आहे कॅमेरा चे फिचर मग काय किती पण काढणार का? बाबा रे बाबा कसले कसले फोटो काढता तुम्ही वाकडे,तिकडे,साईड व्हीव,टॉप व्हीव,आणि काही काही चे तर आम्हाला नाव पण माहीत नाहीत. कधी कधी तर अस वाटतं तुम्ही फिरायला गेल्यावर डोळ्यांनी कमी पाहता आणि फोटोच जास्त काढता.  काय तो आमचा काळ होतो आमच्यासाठी स्टुडिओ बनवला जायचा. मला की नाही त्या चार-पाच पोरी अंतिम वर्षाला असताना नटून फोटो काढायला यायच्या ना ते खूप आवडायचं. त्या आठवणी अजूनही तशाच ताज्या आहेत. दोन दिवसा...

कोरोनातली नवरी

Image
ह्याचा मुडधा बसविला, कुठून आला आहे काय माहीत? कडू कुठला. त्या कोर्टाच्या तारखे सारख्या तारखा पडत आहेत.बाई काय काय प्लान केले होते मी, म्हणल होत जरा फिरली असते टाईम घेतला असता आणि मग विचार केला असता,तर हा बाबा दारातच येवून बसला आहे. पुण्याला जायचं होतं लग्नाची खरेदी करण्यासाठी, काय काय घ्यायचं होत त्याची लिस्टच तयार करून ठेवली होती. मला तो अनुष्का ने तिच्या लग्नात डिझाइनर ड्रेस(सभ्यसाची लेहंगा) घातला होता ना तसाच घ्यायचा होता. त्यांना पण सांगितलं होतं तुम्ही पण विराट नी जसा ड्रेस घातला होता तसाच घ्या. तसं लग्नात घालण्यासाठी दोन चार डिझाइन चे गळ्यातले पाहिले होते पण घ्यायचे राहूनच गेले. हातावर खास अरेबिक डिझाइन ची मेहंदी काढणार होते. मेकअप साठी एका ब्युटीपार्लर वाल्या बाई ला पैसे पण दिले होते. गाजऱ्या वाल्या पोराला पण एक खास गजरा तयार करायला सांगितला होता.पायात नेमकी कोणत्या प्रकारची चप्पल घालायची यासाठी पूर्ण दिवस घातला होता, बाई त्यांच्या पेक्षा उंची थोडी कमीच होती म्हणून हिल वाली सैंडल घेऊ असा निर्णय घेतला होता. नखांना कोणत्या रंगाची नेलपेंट लावायची इथपासून सर्व बारीकसारीक...

तिकडचा आत्मा

Image
काऊन नको आहे बे तुम्हाला ही जिंदगी? जिथं हाये तिथं गप जगा ना इकडं पहिलेच लै कचरा झालेला हाई. आता तुम्ही म्हनतान हे कोण अन कुठून बोलताय? हाव हाव मी आबा होई आबा अन मी इकडून लांबून बोलत हाय. आम्ही श्यान खाल्लं अन इथं आलो. आता जरा माघ जाऊन सांगतो, मी बी तुमच्यातलाच एक व्हतो. दिसभर काम करून जीवाला चार घास खात बी व्हतो, एक वरीस पाऊस कमीच झाला. सावकाराकडनं पाच पन्नास हजार रुपय कर्ज घेतल अन म्हवा यिषय संपला. ते टेन्शन का काय म्हणत्यात ते मला आलं. पण ते काय असतं ते काय मला समाजल नाही बघा. अन मंग काय जे सगळेच करत्यात तेच म्या बी केलं “आत्महत्या". म्हणलं व्हत तिथून सुटणं अन ते टेन्शन जाईन पण कसलं काय? ते अजूनच वाढलं पण आता इथं अजून एक बऱ्या आत्महत्या करायचा इचार बी करू शकत नाही बघा. त्यो ऑप्शन नाही बघा इकडं. खरं सांगू तर म्या चुकीच्या इभागात आलो हाय. तुमच्या इकडं कसं येगयेगळे इभाग असतेत पुलीस इभाग, तहसील इभाग तस इथं बी इभाग हाईत शूर मरण आलेला इभाग,म्हातार व्हावून मरण आलेला इभाग, अपघातात मरण आलेला इभाग आणि आमचा आत्महत्या वाला इभाग. आमच्या इभागाला ना बाकीचे लोकं खालचं समाजतेत,आम्ही पळपुटे,भित्...

कोरोना २.०

Image
नमस्कार मंडळी, कसे आहात विचारण्यात काहीच अर्थ नाही. खूप त्रास दिला ना मी तुम्हाला. मला पण खूप वाईट वाटलं तुमचे हाल पाहून. पण मी तरी काय करणार, आता तुम्ही म्हणता काय कुठून आला हा कोरोना? तुम्ही नाही का एखाद्याला म्हणत तू काय ढगातून पडलास काय? तसाच मी काही ढगातून पडलेलो नाही बाबांनो मी पण जन्म घेतला आहे. तुमची जशी निर्मिती केली जाते तसाच मला पण तयार करण्यात आले आहे. कधी कधी वाटत राव मी चुकीच्या ठिकाणी जन्म घेतला आहे. दुसऱ्या ग्रहावर जन्माला आलो असतो तर  कसं मी यानात फिरलो असतो मज्जा केली असती. पण तुम्ही पण काही कमी नाही केलं, इथं पण मी विमानातून प्रवास केला, रेल्वेत बसून प्रवास केला. पृथ्वीवरचे लोक जरा खतरनाकच आहेत राव. जरा जास्तच डोकं लावतात मला खूप साऱ्या ठिकाणी फिरायचं होत पण तुम्ही ह्या सर्व वाहतुकीच्या सेवा बंद करून टाकल्या. मला काही या ठिकाणी जन्म घेण्याची अजिबात रस नव्हता पण तुमच्यापैकीच काही लोकांनी बंद बाटलीतल्या या जीवाला डिवचल आणि मला जन्म दिला, नाव दिलं, काही ठिकाणी वाढीसाठी पोषक वातावरण तयार केल. कधी कधी मला माणसाचं कौतुक कराव वाटत पण कधी कधी त्याची दैनी अवस्था पाहू...

तो आमचा हक्क आहे

Image
आज सरकारने एक हक्क मात्र नक्की गमावला,मत मागण्याचा. कुठे आहे कोरोना, कोणाला झाला आहे तो. आज एक धडधाकट माणूस रडत आहे फक्त आपल्या स्वतःच्या घरी जाण्यासाठी. या लोकांना माहीत देखील नाही हे कॉरंटईन आहे काय. ना कधी अनुभवलेला ना कधी ऐकलेला हा शब्द अचानक आयुष्यात आला. सरकाने सांगितले आहे १४ दिवस कॉरंटईन राहा. पण मागील १४ दिवसापासून पेक्षा जास्त दिवस झाले हे लोक चालत,रंगडात आहेत.कुठे आहे हा कोरोना कदाचीत तो या लोकांना घाबरलेले असेल. या लोकांसमोर कोरोना हरला. या लोकांचे दुःख च इतके आहे  की तो त्यांच्या जवळपास ही येत नाही. आज एक ताई ने रस्त्याच्या कडेला गोंडस बाळाला जन्म दिला. कुठल्या बर गावाचा जन्मदाखला काढावा या बाळाचा? आज रस्त्यावर काही सुसाट गाड्या पळत आहेत,कदाचित त्या गाड्या या चालणाऱ्या लोकांसाठी एकादे यान वाटत असेल आणि त्यात बसलेले ते लोक ऐलियन भुर कन निघून जातात.  कोरोना खरच इतका वाईट आहे का? साधं पाणी मिळू नये प्यायला. कुठं तरी तीन दगडाची चूल आणि त्यात शिजत घातलेला भात. हे लोक पण रोज स्टेटस टाकत असतील का? “आज ची डिश" कदाचित या लोकांना घरी पोहचल्यावर घरचे लोक घरात घेणारही नाहीत प...

नास्तिक देव

Image
का रे देवा तू स्वतःलाच नास्तिक का बनवून घेत आहेस. तू तुझे दार का बंद केले आहेस. पाप- पुण्य हे शब्द कोणी तयार केले आहेत? आज जगातील लोक तुझ्याकडे ढुंकून पण पाहत नाहीत तुझी रोज पूजा करणारा पुजारी पण तुझ्याकडे येत नाही हल्ली. हे बघ देवा हे असेच चालू राहील तर सर्व जग नास्तिक बनून जाईल आणि पाप-पुण्य, बरोबर-चूक, वाईट-चांगले,इ. असे अनेक शब्द फक्त पुस्तकातच पाहायला मिळतील. दोन चार दिवसापूर्वी एक बातमी ऐकली आई ला कोरोना नाही पण जन्माला आलेल्या बाळाला कोरोना झाला आहे. का त्या मातेने तुझ्याकडे हात पसरावेत आणि काय त्या बाळाने पाप केले होते. एक तर सांगून तरी टाक अजून किती लोकांचा बळी तुला घ्यायचा आहे. म्हणजे लोक बिनधास्त जगातील तरी, सध्या कसल्या तरी ओझ्या खाली असल्याप्रमाणे जगत आहेत. तुमची 33 कोटी लोकसंख्या आहे असे ऐकले आहे या पैकी कोणालाच मानावाबद्दल सहानुभूती नाही का रे, की तिथे पण लोकशाही प्रमाणे चालते सर्व ज्याचे संख्याबळ जास्त त्याच्या मनाप्रमाणे तसे असेल तर खरच मानव जातीच काहीच खार नाही. तू तर पहातोसच पृथ्वीवर कसे राडे होतात ते आणि असे काही तिकडे असेल तर लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा. होऊन जा...

झुलवाकार

Image
जवळजवळ ७ वर्षे झाली असतील या घटनेला आपण इतक्या मोठ्या माणसाच्या घरी आलो आहोत यांची जरा देखील जाणीव नव्हती मला. नाव “उत्तम बंडू तुपे",खडकी येथील घरी गेलो होतो मी.घर सापडायला जरा वेळ गेला कारण ते एका खोणपडात होत. घर तरी कसे म्हणावं एकच १०x१० ची खोली त्यातच स्वयंपाकासाठी असलेली एक चूल आणि पुस्तकाने भरून गेलेल्या भिंती. त्या खोलीत त्या माऊलीने बसायला टाकलं आणि चहा करायला टाकला पण तो देखील कोरा(दूध नसलेला) आणि विचारले देखील चाललं ना तुम्हांसनी मी होकारार्थी मान करून चाललाय की असा इशारा केला. चहा करण्यासाठी चूल पेटवत होती ती चूल, तो चहा मला काहीच समजत नव्हतं काय चाललंय ती आज्जी(कारण ती माझ्या आज्जी च्या वयाची असेल) तीला काय चूल काय लवकर पेटत नव्हती त्या खोलीत सगळा धूर झालेला  तशातच एक छोटी पोरगी पळत पळत आली घसलेटाचे दोन-चार थेंब चिमणीतून ओतले आणि ती चूल पेटवून दिली त्या चुलीत अचानक जाळाचा भडका झाला आणि चहा उकळू लागला ती आज्जी त्यांच्या संसाराच्या गाड्याबद्दल सांगत होती, आणि अचानक त्या पुस्तकाकडे पाहत बोलली कधी कधी वाटत या पुस्तकाला पण या चुलीत टाकावं ”झुलवा" चे “झुलवाका...